बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वसंतनगर तांडा पाचेगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. घरासमोर ठेवलेले तुरीचे पीक गायीने खाल्ल्यान एकास तिघांनी मारहाण करून विष पाजले होते. त्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गेवराई ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. विकास गणेश जाधव (वय 25. रा. वसंतनगर तांडा, पाचेगाव) असे […]
मुंबई : राज्यात थंड वारे वाहू लागल्याने नागपूरमध्ये अचानक पारा घसरला आहे. नागपूरमध्ये अचानक पारा घसरल्याने नागपूरात कडाक्याच्या थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी सुरू पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. देशात कालपासून अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. देशात प्रामुख्याने उत्तर भारतात अचानक तापमानात […]
कोल्हापूर : कोल्हापुरात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला आणि हाच वारसा अद्याप ही छत्रपती घराणे पुढे घेऊन जात आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या निकाली कुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. राज्यात जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा छत्रपती […]
मुंबई : उर्फी जावेद प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या आरोपांना आज प्रत्युत्तर दिले. रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नाही. त्या बाष्कळ विधाने करत आहेत. आता ती बंद केली पाहिजे. उर्फी जावेद प्रकरणात चाकणकर यांनी योग्य कारवाई केली […]
अहमदनगर : जिल्ह्यातील आदिवासी भागातील राहीबाई पोपरे या देशी बियाणे संग्रहाक म्हणून देशभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले. मात्र या राहीबाईंचे भाषण राष्ट्रीय पातळीवरील एका विज्ञान विषयक कार्यक्रमात बंद करण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे पडसाद सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटू लागले आहेत. नागपूरमधील १०८ वी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये महिला […]
मुंबई : पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युतीवर मुंबईत घोषणा झाली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत घेत घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरु आहे. त्यापूर्वीच ह्या दोन्ही गटाची युती झाली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज […]
मुंबई : आपण साहित्य संमेलन घेतो, उद्योगाचे वेगवेगळे प्रोग्राम घेतो पण सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी लोकांना एकत्रित येण्याचा योग येत नाही. या लोकांना एकत्रित आणण्यासाठी हे विश्व मराठी संमेलन घेतलं जात आहे. काही लोकांना सवय असते. तशी या विश्व मराठी संमेलनात देखील उणदुणे काढतील. दिपक केसरकर यांनी जे तुळशीचे रोपटं लावलंय. त्यांचा एक दिवस […]
औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अविनाश श्रीराम राठोड आणि औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानदेव रोडे, कविता भोजने, लीला रोडे, मुक्तार शेख यांनी उपसरपंच निवडीसाठी सरपंचाला दोन वेळा मतदान अधिकाराविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. कोणत्याही निवडणुकीत एका उमेदवाराला एकदाच मतदान करण्याचा मतदाराला अधिकार असतांना, उपसरपंच […]
पुणे : शहरात पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे अनेक उदाहरणं समोर येत आहेत. नुकतेच मार्केट यार्ड परिसरात एकाने सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आता त्यानंतर खडकी परिसरातून देखील अशीच बातमी समोर येत आहे. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या साउंडवर कारवाई करणाऱ्या टोळक्याने गस्त घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केल्याची घटना खडकीतील मुळा रस्ता परिसरात घडली […]
अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसला धक्का दिला आहे. मंगळवारी श्रीगोंदा नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या सहा नगरसेवकांनी दिपाली सय्यद यांच्या उपस्थितीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिंदे गटात प्रवेश केला. श्रीगोंदा नगरपालिकेत शिंदे गटाचा पुढील नगराध्यक्ष करण्यासाठी दिपाली सय्यद यांचे प्रयत्न आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्या वर्षा बंगल्यावर पाठपुरावा करीत होत्या. यातूनचं त्यांनी काँग्रेसला […]