कोची : आयपीएल 2023 चा लिलाव सुरू झाला आहे. या लिलावाची सुरुवात खूपच रंजक झाली आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा मान सॅम करन यानं पटकावला असून तब्बल 18.50 कोटींना पंजाब किंग्सने त्याला विकत घेतलं आहे. तर कॅमरॉन ग्रीन आणि बेन स्टोक्स यांनीही रेकॉर्ड ब्रेक केले आहे. ग्रीनला 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सने तर बेन […]
काठमांडू : 70 आणि 80 च्या दशकातील सीरिअल किलर चार्ल्स शोभराज अखेर तुरुंगाबाहेर आला आहे. 19 वर्षांपासून तो नेपाळच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याची सुटका झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्याला त्याचा देश फ्रान्सला पाठवण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. चार्ल्स शोभराजची आज नेपाळच्या काठमांडू सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयानं त्याची सुटका […]
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील ब्राम्हणी येथील एका हिंदू महिलेचे बेकायदेशीर धर्म परिवर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या भारतीय मानवाधिकार परिषदेने उघडकीस आणला होता. या धर्मांतरण प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार राम सातपुते यांनी ‘पीआय’ प्रताप दराडे याचे धर्मांतराला संरक्षण असल्याचा आरोप केला. यासंदर्भात नगर धर्मांतरण प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप […]
पुणे : फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पुणे पोलीसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर होता. राज्यात सत्ताबदल होताच रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट देण्यात आली होती. या संदर्भात पुणे पोलीसांनी क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयात सादर केला होता. परंतु, […]
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने आपल्या कामगिरीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईच्या कर्णधाराने रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध द्विशतक झळकावले. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर मुंबईने तीन शतके झळकावली. अजिंक्य रहाणे खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून बाहेर आहे. रहाणेने हैदराबादविरुद्ध चांगली फलंदाजी करताना 261 चेंडूत 204 धावा केल्या. यादरम्यान त्याने 26 चौकार आणि […]
नागपूर – महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत ३ हजार २५८ सरपंच पदे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. भाजप आणि शिंदे गटाला ३ हजार १३ सरपंच व इतर १ हजार ३६१ आहेत. यामध्ये ७६१ हे महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचे ४ हजार १९ सरपंच निवडून […]
नागपूर : ‘टीईटी’ घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात संताप व्यक्त केला. विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही, त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करुन त्याची माहिती सभागृहात […]
नागपूर – नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने सतरा वर्षांच्या तरुणीला आई-वडीलांसमोर प्राण सोडावे लागल्याची घटना दुर्दैवी, सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे वेंटीलेटर उपलब्ध करण्यात यावेत. चालू राहतील याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. […]
मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने मालिकेतील अखेरच्या पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ५४ धावांनी पराभव केला आहे. या विजयाने ऑस्ट्रेलिया महिला संघाने मालिका ४-१ अशी जिंकली आहे. अॅशले गार्डनरची (३२ चेंडूंत नाबाद ६६ आणि २० धावांत २ बळी) अष्टपैलू कामगिरी आणि हिदर ग्रॅहमच्या (८ धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. अॅशले […]
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धा काही दिवसांपूर्वी वादात सापडली होती. कुस्तीचा आखाडा अहमदनगरमध्ये होणार की पुण्यात यावरुन पैलवानांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यावर शरद पवार आणि ब्रिजभूषण सिंह यांनी अखेर तोडगा काढला होता. आता 11 ते 14 जानेवारीदरम्यान पुण्यात ही स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार 10 […]