नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. पण यंदा परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे. राज्यांची संख्या अधिक असल्यामुळे दरवेळी ठराविक संख्येतच काही राज्यांच्या चित्ररथांची निवड होत असते. अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण देण्यात आलंय पण त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. यंदा महाराष्ट्राने साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्यासह आठ वेगवेगळे प्रस्ताव […]
नागपूर : महाराष्ट्रात अधिकृत घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुक निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १ हजार ३०० ग्रामपंचायतीवर आणि महाविकास आघाडीचे इतर दोन घटक पक्ष लक्षात घेता २ हजार ६५१ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. शिवसेना आणि भाजप यांच्या मिळून साधारणपणे २ हजार २०० ग्रामपंचायतीवर झेंडा फडकला […]
कोल्हापूर : जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कागणी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नोटाला सर्वाधिक मतदान मिळालं. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार शितल अशोक कोरे यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. यावर आता अनेकांनी आक्षेप घेतला आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेले कोणीही पसंत नसल्यास मतदारांना ‘नोटा’ म्हणजे वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसल्याचा पर्याय देण्यात आला आहे. पण जर या नोटालाच सर्वाधिक […]
नागपूर : नागपूर न्यास जमीन प्रकरणावरून विरोधकांनी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर विधान परिषदेत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. नागपूर न्यास प्रकरणात मी नगरविकास मंत्री अथवा मुख्यमंत्री म्हणून कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ […]
नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस […]
२००९ मध्ये ‘अवतार’ पहिल्यांदा आला तेव्हा या चित्रपटाने प्रचंड धुमाकूळ घातला होता. आता तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार’चा सिक्वेल सिनेमागृहात अवतरलाय. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटात पाणी आणि पाण्याखालील अनोखं विश्व आपल्यासमोर मांडलंय. अद्भूत व्हिएफएक्स, रिअल साऊंड इफेक्टस आणि नेत्रदीपक दृश्ये पाहण्याचा हा एक विलक्षण अनुभव आहे. ‘अवतार: द वे […]
एखाद्या फिल्ममेकरसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज काय असू शकतं? तर पूर्ण चित्रपट एखाद्या कलाकाराला डोळ्यासमोर ठेऊन विचार केलेला असतो आणि अचानक त्या कलाकाराचे निधन होते. हेच घडलं मार्वलच्या ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ ह्या चित्रपटाच्या वेळी. ब्लॅक पँथरला खरी ओळख मिळाली ती चॅडविक बोसमनच्या भूमिकेने. पण 2020 मध्येच सुपरहिरो ब्लॅक पँथर उर्फ सम्राट टीचालाची भूमिका करणारा चॅडविक […]
नागपूर : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी श्रध्दा वालकर प्रकरणाची विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करणारी लक्षवेधी विधानसभेत मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशिष शेलार यांची मागणी मान्य करीत विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करण्याची घोषणा केली. ‘कोणत्याही जाती-धर्माची मुलगी असली तरी सरकारने काळजी केली पाहिजे. श्रध्दा वालकर प्रकरणात […]
सांगली : आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री विजय झाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सातही जागांवर पडळकर समर्थक सदस्य विजयी झाले आहेत. तर सरपंचपदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या ३०० मतांनी निवडून आल्या आहेत. जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत […]
औरंगाबाद : जिल्ह्यात 208 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले होते. आज सकाळी आकरा वाजता ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरवात झाली. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. पैठण तालुक्यातील शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची बनलेली बिडकीन ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या ताब्यात गेली आहे. आता वैजापूर तालुक्यातील महालगावची ग्रामपंचायत देखील ठाकरे गटाच्या ताब्यात गेली आहे. शिंदे गटाचे आमदार रमेश […]