नागपूर : शाई फेकीचा सरकार आणि भाजपने चांगलाच धसका घेतला आहे. शाई फेकीपासून वाचण्यासाठी आता विधानभवन परिसरात तसेच भाजपच्या कार्यक्रमांत शाई पेन आणण्यास मनाई करण्यात आली आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिल्ड वापरण्यास सुरुवात केली आहे. आता त्यापुढे आता शाई पेनवर देखील बंधन आणली जात आहे. विधान भवन परिसरात पहिल्या दिवशी प्रवेश […]
नागपूर : आपलं सरकार सत्तेत येऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. या संपूर्ण कालावधीत महाराष्ट्रातील निर्णय-लकवा आपण संपविला. निर्णय न घेणे, हाच महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष बैठकीत महाविकास आघाडीवर केली. गेल्या अडीच वर्षात कोणत्याही घटकाला मदत त्यांनी केली नाही. विकास कामांना स्थगिती […]
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत नवीन आजारांचा समावेश केला आहे. विशेष बाब म्हणजे याआधी या योजनेत मोजक्याच आजारांचा समावेश होता. मात्र आता खर्चिक आजारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. […]
नागपूर : भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. जोपर्यंत या वाचाळविरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष आवाज उठवत राहतील. मंत्र्यांवर शाईपेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, पत्रकारावर गुन्हे दाखल गेले. पोलिसांना निलंबित करण्यात सरकारने तत्परता दाखवली मग महापुरुषांचा अपमान करणारे भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत? […]
नागपूर : नागपूर न्यास जमीन वाटप प्रकरणी उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तत्कालीन नगरविकास मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर बोट ठेवण्यात आलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जमीनीचे वाटप झालं कसं? असा सवाल न्यायालयाने विचारला आहे. यावरुनच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. काही लोकं मुख्यमंत्र्यांना […]
नागपूर : सीमावर्ती लोकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार पुर्णपणे उभा आहे. त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका असणार आहे. यासंदर्भात आज लोकतांत्रिक पद्धीतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली. या संदर्भातली चर्चा कर्नाकटच्या मुख्यमंत्र्यांशी करु, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेदत दिली. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागाबाबत राज्याची भूमिका तसूभरही मागे […]