T20 World Cup 2024 : आता ICC T20 विश्वचषक (T20 World Cup) सुरु होण्यासाठी फक्त 3 महिने उरले आहेत, पण भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यातील महामुकाबल्याची उत्सुकता आतापासूनच सुरू झाली आहे. अमेरिकेत होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, क्रिकेटच्या या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याच्या तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या […]
Pune News : पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून बिबट्या पसार झाला आहे. संग्रहालयातील आवारामध्ये अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. प्रशासनाच्या मदतीने बिबट्याचे शोधकार्य सुरु आहे. कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात तीन मादी बिबट्या असून त्यांच्यासाठी एक नर बिबट्या आणण्यात आला होता. प्राणी अदलाबदल कार्यक्रमांतर्गत कर्नाटकातून हा बिबट्या आणण्यात आला होता. प्राणीसंग्रहालयातील एका ठिकाणी बिबट्याला […]
JP Nadda : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी राज्यसभेचा राजीनामा (Rajya Sabha Election) दिला आहे. राज्यसभेच्या अध्यक्षांनी जेपी नड्डा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. नड्डा यांनी हिमाचलमधून निवडून आलेल्या जागेचा राजीनामा दिला आहे. ते आता गुजरातमधून नियुक्त झालेल्या जागेवर खासदार राहणार आहेत. जेपी नड्डा यांचा हिमाचलच्या जागेचा कार्यकाळात 14 दिवस शिल्लक होता. नुकत्याच […]
Electoral Bonds : भारतीय स्टेट बँकेने (SBI) निवडणूक रोख्यांची माहिती (Electoral Bonds) देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) 30 जूनपर्यंत मुदत मागितली आहे. सुप्रीम कोर्टाने नुकतीच इलेक्टोरल बाँड योजना रद्द केली होती. तसेच, न्यायालयाने SBI ला इलेक्टोरल बाँड्सची माहिती निवडणूक आयोगाला देण्यास सांगितले होते. दरम्यान, SBI स्वतः निवडणूक रोखे जारी करत असे. 15 फेब्रुवारीला सरन्यायाधीश डीवाय […]
Loksabha Election 2024 : बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. तीनही जागांचा आढावा घेतल्यानंतर चंद्रकांतदादा वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहेत. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर (Loksabha Election) राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे. तर पुण्याच्या जागेवर भाजपचा दावा आहे. यामध्ये […]
Ajit Pawar on Amol Kolhe : शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली आहे. सेलिब्रिटी उमेदवारांवर तिकीट देऊन चूक झाली, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. मी पक्षात यावं म्हणून मला गुपचूप भेटून दहा दहा वेळा निरोप का पाठवले? असं खोचक प्रत्युत्तर अमोल […]
Chandrakant Patil on Mahadev Jankar : रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीच्या बैठकांना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन केले होते. मधल्या काळात शरद पवार यांनी त्यांना माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर देखील दिली होती. यावरुन महाविकास आघाडीसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात […]
Arjun Modhwadia : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) काँग्रेस पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. आता गुजरातमधील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या अर्जुन मोढवाडिया (Arjun Modhwadia) यांनी गुजरात विधानसभेचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. अर्जुन मोढवाडिया यांनी पक्ष सोडणे […]
Jitendra Awhad’s letter to Prakash Ambedkar : महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नाही. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांना वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं होतं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार की नाही यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहेत. अशात आंबेडकरांनी प्रचार सभांचा धडाकाही सुरु केला आहे. […]
Amol Kolhe on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. यावेळी अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमोल कोल्हे सारख्या सेलिब्रिटीला उमेदवारी देऊन मी चूक केल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले आहे. […]