IND Vs ENG : रांची कसोटीच्या (IND Vs ENG) पहिल्या दिवसअखेर इंग्लंडचा डाव सावरला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाहुण्यांची धावसंख्या 7 विकेट्सवर 302 धावा आहे. जो रूट (Joe Root) 106 धावा करून नाबाद परतला. तर, ओली रॉबिन्सन 31 धावा करून क्रीजवर आहे. सकाळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचे […]
Loksabha Election 2024 : राजकीय निवडणुकीच्या आखाड्यात आणखी एका ठाकरेची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे पहिले व्यक्ती होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेची निवडणूक लढवली होती. आता राज ठाकरेंचे (Raj Thackeray) पुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पुणे लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे […]
IAS Officer Transfers : राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS Officer Transfers) बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये अकोला महापालिकेच्या आयुक्त कविता द्विवेदी (IAS Kavita Dwivedi) यांची पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर कार्तिकी एन एस (IAS Karthiki NS) यांची नियुक्ती पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालक पदी करण्यात आली आहे. बदल्या […]
Farmer Protest : आगामी लोकसभा निवडणुका आणि राजधानी दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmer Protest) मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने 2024-25 या गळीत हंगामासाठी 10.25 साखर उताऱ्यासाठी उसाला 340 रुपये प्रतिक्विंटल (3400 रुपये प्रतिटन) एफआरपी देण्याचे निश्चित केले आहे. यापूर्वी हा दर 315 रुपये प्रतिक्विंटल […]
Mephedrone drug : चार महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी आणि चंद्रमौली सहकारी औद्योगिक वसाहत येथे काही कारवाईत मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन या घातक अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर उत्पादन आणि विक्री करणाऱ्या टोळीच्या प्रमुखासह दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या टोळीतील एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे. […]
Sharad Pawar on Dilip Walse Patil : विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादीचा निकाल विरोधात दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीच्या फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजलेल्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी शड्डू ठोकला आहे. पवारांनी आंबेगाव मतदार संघातील कार्यकर्त्यांना वळसे पाटलांचा पराभव करण्याचे आवाहन केले. येत्या दोन […]
World Book Records : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने (National School of Drama) आज देशभरात एकाच वेळी 1500 नाटके (Drama) सादर करून नवा विश्वविक्रम केला आहे. नवी दिल्ली येथील एनएसडीच्या कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात बंगळुरूहून आलेल्या शैलजा यांनी सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांना वर्ल्ड बुक रेकॉर्डचे (World Book Records) प्रमाणपत्र प्रदान केले. केवळ भारतीय रंगभूमीच्याच नव्हे, तर […]
Gunratna Sadavarte on Manoj Jarange : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मराठा समाजबांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे कोण आहे? जरांगे काय दादा झाला आहे का? असा सवाल त्यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार […]
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलन निर्णायक अवस्थेत असताना आंदोलनात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यातील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी गंभीर आरोप केले आहेत. 23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजणगाव गणपती येथे उच्चपदस्थ […]