ठाणे : कळव्यामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची स्थिती ही काय आज वाईट झालेली नाही. वर्षेनुवर्षे या रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकटच होत गेली. खरतरं इतक्या उत्कृष्ट अन् मोठ्या जागेत फार सुंदर असे रुग्णालय चालवता आले असते. पण, माझे आजहीच हेच म्हणणे आहे की, ठाणे महानगरपालिकेचे उत्पन्न पाहता आणि गेल्या काही वर्षांतील या रुग्णालयाची अवस्था पाहता हा […]
नाशिक : काल रात्री जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊसामुळे रब्बी गव्हाच्या पिकाला चांगलाच तडाखा बसला आहे. या अवकाळी पाऊसामुळे द्राक्ष, गहू, कांदा, या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन होळीच्या सणाला शेतकऱ्यावरती मोठं संकट आलं आहे. होळीची पुरण अवकाळी पावसाने शेतकऱ्याकडून हिसकावून घेतली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हात तोंडाशी आलेल्या गव्हाच्या पिकाला बसला […]
नवी दिल्ली : विराट कोहलीच्या गेल्या 5 वर्षातील खराब कामगिरीचा परिणाम त्याच्या कसोटी फलंदाजीच्या सरासरीवर देखील स्पष्टपणे दिसून येतो जो एका वेळी 50 पेक्षा जास्त असायचा. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम आहे. विराट कोहलीच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. एवढेच नाही तर विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही कमी होत आहे. […]
सोनई – कौटुंबिक दुःखाच्या प्रसंगी सांत्वन करणे, धीर देणे ही आपली भारतीय संस्कृती असताना तालुक्यातील विरोधकांनी त्याचे राजकीय भांडवल करुन त्रास देण्याचा उद्योग चालविल्याची खंत मुळा उद्योग समुहाचे संस्थापक ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली. तालुका दूध संघाच्या कथित वीज चोरी प्रकरणी रुग्णशय्येवरील प्रशांत गडाख यांच्यावर दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी आयोजित […]
अहमदाबाद : इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 विकेट्सने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यातील विजयासह कांगारू संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 च्या अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर शेवटचा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला आपल्या संघात काही बदल करू शकते. भारतीय संघाला वर्ल्ड […]
अमरावती : भारतीय जनता पक्षामध्ये कोणी आले म्हणून त्यांची चौकशी बंद झालेली नाही. असे असेल तर त्यांनी त्याचे उदाहरण दाखवावे. कोणाचीही चौकशी बंद होत नाही. भाजपमध्ये असो किंवा कुठेही असो, ज्यांनी चूक केली आहे, त्यांची चौकशी होणारच आहे, असा इशारा फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना अमरावतीत दिला. भारतीय जनता पक्षाचे सरकार हे यंत्रणांचा गैरवापर करत असल्याच पत्र […]
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करकंब पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन सोहळ्यानंतर विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवारांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं असता, त्यांनी पवारांवर खोचक शब्दात टीका केली. “शरद पवारांनी आता स्वप्नरंजन करणे थांबवले पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये भविष्यकारांची संख्या वाढली […]