मुंबई : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या हंगामाला नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. या T20 लीगचा पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यात होत आहे. या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. WPL ची पहिली आवृत्ती सुरू होण्याची सर्व […]
जळगाव : अडीच तीन वर्ष लोक अडचणीत होते, लोक मरत होते, तेव्हा घरातून पाय बाहेर काढला नाही, आता त्यांना उशीरा सुचलेले शहाणपण आहे. आता त्यांना लोकांचे प्रश्न दिसत आहेत, महागाई दिसत आहे, असे म्हणत खेड येथे होणाऱ्या उध्दव ठाकरेंच्या सभेवरुन मंत्री गिरीश महाजन यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. आता लोकांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून हकलले […]
लडाख : लडाखमध्ये चीनसोबतच्या सीमा वादानंतर भारतीय लष्कराने गस्त वाढवली आहे. सीमेवर जास्तीत जास्त अंतरापर्यंत नजर ठेवण्यासाठी भारतीय लष्कराचे सैनिक आता गस्त घालण्यासाठी घोडे आणि खेचरांचा वापर करत आहेत. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये लष्कराच्या जवानांनी घोडे आणि खेचरांच्या सहाय्याने एलएसीच्या आसपासच्या भागाची पाहणी केल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सीमेवर […]
मुंबई: राज्यातील नॅक मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना आता नॅक मानांकन गरजेचं आहे अन्यथा प्रवेशप्रक्रिया रद्द करण्यात येणार असल्याचे आदेश उच्चतंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. नॅक मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना उच्चतंत्र शिक्षण विभागाने 31 मार्च पर्यंत मुदत दिली आहे. राज्यातील तब्बल 60 टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे हा आदेश […]
परळी : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज परळीत कामाच्या भूमी पूजन कार्यक्रमात बोलताना नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे टोला लगावला. त्याम्हणाल्या मी सगळे काम केले पण कधीच नारळ फोडायला आले नाही कधीच मी श्रेय घ्यायला आले नाही. परंतु हे कामाचे श्रेय घेण्यास सर्वात पुढे असतात. यावेळी त्यांनी केंद्रात व राज्यातील सरकारमुळे […]
ग्वाल्हेर : यशस्वी जैस्वालने इराणी चषकातील पदार्पणाच्या सामन्यात इतिहास रचला आहे. ग्वाल्हेरमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध पहिला सामना खेळणाऱ्या यशस्वीने दुसऱ्या डावातही शतक झळकावले. त्याच सामन्यातील पहिल्या डावात त्याने 213 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही शतक झळकावण्यात तो यशस्वी ठरला. इराणी चषकाच्या एका सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. उर्वरित भारताचे […]
अमरावती : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची आमदार रवी राणा यांच्या अमरावती जिल्ह्यातील बडेनरा मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. खासदार नवनीत राणा ह्या नेहमी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. याचा समाचार घेत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांची खिल्ली उडवत त्यांना इशारा दिला. सुषमा अंधारेंनी नवनीत राणा यांचा अक्का असा उल्लेख केला. ईडी, […]
मुंबई : महिला इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडिअमवर पहिला सामना रंगणार आहे. महिला आयपीएलचे सर्व सामने मुंबईतील मैदानात रंगणार आहेत. त्यासाठी तिकिटविक्रीला सुरुवात झाली आहे. बूक माय शो येथे या स्पर्धेची तिकिटं उपलब्ध आहेत. महिला इंडियन प्रीमियर लीग पाहण्यासाठी महिलांना आणि […]
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या विधिमंडळ गटाबाबत केलेल्या वक्तव्यावर आज विधानसभेत रणकंदन झाले. सत्ताधारी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली होती. हक्कभंगाबाबत चौकशी करुन दोन दिवसांत चौकशी करुन 8 मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल […]