पुणे: कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26) मतदान हाेणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. येथे 2 लाख 75 हजार मतदार, 270 मतदान केंद्रांवर त्यांचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 1200 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी 756 मतदान यंत्र 378 कंट्रोल युनिट व 405 व्हीव्हीपॅट यंत्र वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर नेमलेल्या मतदान केंद्राकडे ते रवाना होणार […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे पैसे पोलिसांकडून कार्यकर्ते वाटत आहेत, असा आरोप करून आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ते उपोषण केलं. त्यानंतर पोलीस उपयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान, आचारसंहितेचा भंग करून धंगेकर पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला […]
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एक शेतकरी कांदा विकण्यासाठी 70 किमी दूर गेला, परंतु त्याचा 512 किलो कांदा केवळ 1 रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला. अशाप्रकारे, शेतकऱ्याला 512 रुपये मिळाले, ज्यामध्ये कांदा बाजारात नेण्यासाठी लागणारा खर्च वजा करून त्याला फक्त 2 रुपये मिळाले. शेतकऱ्याच्या कांद्याचा दर्जा निकृष्ट असल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे. शेतकरी 70 किमी दूर […]
मुंबई : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली, हे ऐतिहासिक पाऊल आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे खूप खूप आभार अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ व […]
रायपूर : रायपूरमध्ये काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी देशभरातील काँग्रेस नेते पोहोचले आहेत. या अधिवेशनाला राहुल गांधी आणि सोनिया गांधीही उपस्थित होते. सुकाणू समितीच्या बैठकीत CWC निवडणुका होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सदस्य नामनिर्देशित करण्याचे अधिकार सर्वानुमते देण्यात आले आहेत. विषय समितीच्या बैठकीत राजकीय, […]
पिंपरी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तू तू मै मै चालू असताना शरद पवार यांनी याबाबत केलेल्या टिप्पणीमुळे याला आणखीनच हवा मिळाली. दरम्यान, या शपथविधीचे साक्षीदार असलेले पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही यावर प्रतिक्रिया देऊन टाकली अन या घटनेचा साक्षीदार असल्याचे […]
अलिबाग : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अलिबागच्या आवास लिव्हिंगमध्ये 2 हजार चौरस फुटाचा आलिशान बंगला 6 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात व्यस्त असल्याने, त्याचा भाऊ विकास कोहली याने अलिबाग उपनिबंधक कार्यालयाला भेट दिली आणि नोंदणीची औपचारिकता पूर्ण केली आहे. कोहलीने या व्यवहारासाठी 36 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले. या […]