पुणे ; नवले पुल परिसरात अपघातांचे सत्र सुरूच असून आज सायंकाळी पुन्हा अपघात झाला आहे. नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (ता.11 फेब्रुवारी) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. नऱ्हे येथील […]
नाशिक : मला काय मिळाल या पेक्षा आता पक्षासाठी काय करता येईल हे कार्यकर्त्याने पाहण्याची गरज आहे. पुढच्या काळात सरकार आल तर सर्वांना न्याय देता येईल. असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यान दिला. पदे येतील जातील परंतु आपल्याला जनतेची सेवा करायची आहे. येत्या काळात जनता आपल्यालाच सत्तेत ठेवणार आहे. त्यामुळे कुठलीही अपेक्षा नकरता कामे करा. […]
मुंबई : भरडधान्य दिन म्हणून एक दिवस साजरा करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मान्य केला. 2023 हे वर्ष भरड धान्य दिन म्हणून साजरे केले जात आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतात पूर्वी भरडधान्यांचे पीक भरपूर होते. याचे पुरावे प्राचीन संस्कृतींमध्ये सापडले आहेत. भारताने 2018 हे वर्ष बाजरीसाठी राष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते. […]
Twitter : ज्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर आधीपासून ब्लू टिक आहे, त्यांच्या ब्ल्यू टिक लवकरच हटवल्या जाणार आहेत. मस्कच्या आगमनापूर्वी, ट्विटर सेलिब्रिटी, राजकारणी, पत्रकार इत्यादींच्या खात्यांची पडताळणी केली जायची आणि व्हेरियफेकेशन करून ब्ल्यू टिक दिली जायची. मात्र, आता सरसकट कोणीही या ब्ल्यू टिकचा वापर करू शकत नाही. ज्यांना ब्ल्यू टिक पाहिजे त्यांना आता पैसे मोजावे लागणार. भारतासह […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba byelection) ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पक्षावर (BJP) नाराज असल्याची चर्चा थांबायचे नाव घेत नसून अनेक वेगवेगळ्या कृत्यांनी ही नाराजी पुढे येत आहे. नारायण पेठ येथील मोदी गणपती मंदिरा (Modi Ganapati Temple) शेजारी असाच एक फलक लागला असून त्यातून भाजपला योग्य तो संदेश देण्याचा उद्योग काही मंडळींनी केला असे दिसून […]
अहमदनगर : जिल्हा परिषदेचे साईज्योती बचतगटांचे प्रदर्शन आजपासून न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू झाले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडले. या प्रदर्शनात कृषी महोत्सव व पशू प्रदर्शन यांचाही यंदा समावेश करण्यात आला आहे. १२ कोटींचा रेडा मात्र हरियाणा येथील दारा नावाचा १२ कोटी रुपयांचा रेडा हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण […]
मुंबई : महाराष्ट्रात सहकारी संस्था काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी अनेक वर्षांच्या मेहनत व परिश्रमाने उभ्या केल्या आहेत. भाजपाला हेच खूपत असल्याने आता केवळ भाजपा जिल्हाध्यक्षांच्या शिफारसीवरच सहकारी संस्थांची नोंदणी देऊ असा फतवा सहकारमंत्री अतुल सावे यांनी काढला आहे. सहकार मंत्र्यांचे हे वर्तन मंत्रिपदाच्या शपथेचा भंग असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अतुल सावे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, […]
नवी दिल्ली : खर्गे यांनी घातलेल्या मफलरची किंमत ५६ हजार रुपये असल्याचा आरोप भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी केला आहे. मफलरच्या किमतीचा स्क्रीनशॉटही त्यांनी ट्विट केला आहे. पूनावाला यांनी पीएम मोदींचा फोटोही ट्विट केला आहे. या फोटोमध्ये पीएम रीसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेले जॅकेट घातलेले दिसत आहेत. पूनावाला यांनी लिहिले, “अपना अपना, संदेश अपना अपना.” […]
नवी दिल्ली : सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यातीलवाद टोकाला गेला. गटनेते बाळासाहेब थोरात यांनी नाराज होऊन काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नवीन गटनेता ठरवण्यासाठी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. नव्या गटनेते पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर असल्याचं समोर येत आहे. पृथ्वीराज चव्हाण […]