मुंबई : ज्याप्रमाणे शरीरात काही आजारामुळे लक्षणे दिसू लागतात, त्याचप्रमाणे तुमच्या जिभेचा आकारही शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचे दर्शवू लागतो. जिभेला सुरकुत्या पडणे ही जीवनसत्त्वांची कमतरता देखील असू शकते. तुम्ही तुमच्या शरीराची जीवनसत्वाची गरज पूर्ण करण्यात अयशस्वी होऊ शकता, त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, तुमच्या जिभेचा रंग वेगळा होत असेल किंवा जिभेला सुरकुत्या पडत असतील तर […]
पुणे : वाळूच्या धंद्यामुळे निवडक लोक श्रीमंत झाले, तसेच बाळूच्या उपशामुळे नदी किनाऱ्याचा शेतकरी उध्वस्त झाला. बाळू उपश्यामुळे नदी किनाऱ्याच्या जमिनी अस्तित्वात राहिल्या नाही. यामुळेच यापुढे राज्यातील वाळू लिलाव कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात राज्य शासन लवकरच स्वतंत्र धोरण आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केली. नारायणगाव येथील […]
नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या शिवपिंडीवर काही दिवसांपूर्वी बर्फ जमा होत असल्याचे समोर आले होते. मात्र हा जमा झालेला बर्फ पुजाऱ्यांनी केलेला बनाव असल्याचे चौकशी समितीत उघड झाले आहे. या प्रकरणी पुजाऱ्यासह ट्रस्टच्या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी देवस्थान समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, 30 […]
मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदाम, बेदाणे, पिस्ता, शेंगदाणे आणि काजू यांसारखे हे सर्व ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारे आरोग्यासाठी फायदे देतात. या ड्रायफ्रुट्समध्ये समाविष्ट असलेल्या काजूमध्ये प्रथिने, फायबर आणि मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, जस्त, तांबे यांसारखी खनिजे भरपूर असतात. काजूमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 आणि थायमिन देखील मुबलक प्रमाणात असते. तुम्ही तुमच्या आहारात […]
मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेनंतर आयसीसीने टी-20 क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा युवा सलामीवर फलंदाज शुबमन गिलने (Shubman Gill) मोठी झेप घेतली आहे. गिल तब्बल 168 स्थानांची झेप घेत 30 व्या स्थानी पोहचला आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अव्वल स्थानावर […]
अंकारा : तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. आतापर्यंत एकूण 11,416 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची संख्या 40 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. दोन्ही देशांना मदत करण्यासाठी 70 हून अधिक देश पुढे आले आहेत. ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारतही मदत पाठवत आहे. वास्तविक, ‘मित्र’ हा शब्द तुर्की आणि हिंदी भाषांमध्ये वापरला जातो, म्हणून […]
त्रिपुरा : त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 259 उमेदवार रिंगणात आहेत. एका अहवालानुसार, निवडणुकीच्या रिंगणात विजयाचा दावा करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये जवळपास 45 करोडपती उमेदवार आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की भाजपकडे एकूण 17 करोडपती उमेदवार आहेत. टिपरा मोथा पक्षाचे 09 आणि माकपचे सात उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपचे सर्वाधिक करोडपती उमेदवार वृत्तानुसार, काँग्रेसचे […]
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेत रोहित शर्मा पहिल्यांदाच टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसणार आहे. नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा कर्णधार म्हणून तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत अनेक कर्णधारांनी भारताची कमान सांभाळली आहे. मात्र महेंद्रसिंग धोनी आजपर्यंतचा सर्वात यशस्वी […]