Lok Sabha Election Result Live : बीडमध्ये पंकजा मुंडे पराभूत, बजरंग सोनवणे सात हजार मतांनी विजयी

  • Written By: Published:
Lok Sabha Election Result Live : बीडमध्ये पंकजा मुंडे पराभूत, बजरंग सोनवणे सात हजार मतांनी विजयी

Lok Sabha Election Result Live Update : लोकसभा निवडणूक (Loksabha Election Result) निकाल 2024 ची मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह दिग्गज उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. निकालापूर्वी समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार देशात एनडीएची सत्ता स्थापन होईल असा अंदाज वर्तवण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रातील जनतेने नेमकी कुणाच्या हातात सत्ता दिली आहे याचे रिअल टाईम अपडेट देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग… (Loksabha Election Result Live Updates )

LIVE NEWS & UPDATES

  • 05 Jun 2024 02:46 PM (IST)

    महाराष्ट्रात पुन्हा कमबॅक करण्यासाठी मला सरकारमधून मोकळं करा - देवेंद्र फडणवीस

  • 04 Jun 2024 05:53 PM (IST)

    कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे विजयी

    कल्याणमध्ये पुन्हा शिंदेशाही, श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात पडली विजयाची माळ. ठाण्याइतकाच कल्याण मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा होता. श्रीकांत शिंदेंविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला आहे.

  • 04 Jun 2024 05:45 PM (IST)

    नगरमध्ये मोठा उलटफेर; सुजय विखे यांचा पराभव

    नगरमध्ये मोठा उलटफेर; सुजय विखे यांचा पराभव शरद पवार गटाच्या निलेश लंकेंचा दणदणीत विजय निलेश लंकेंचा 25 हजाराच्या लीडने विजयी

  • 04 Jun 2024 05:41 PM (IST)

    वर्ध्यात अमर काळे विजयी; रामदास तडस यांना पराभवाचा धक्का

    वर्ध्यात अमर काळे ठरले जाएंट किलर; रामदास तडस यांना पराभवाचा धक्का

  • 04 Jun 2024 05:41 PM (IST)

    छत्रपती संभाजनगर : खैरे, जलील यांचा पराभव करत संदिपान भुमरे विजयी

    छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे विजयी झाले आहेत. येथील अटीतटीच्या लढतीत भुमरे यांनी एमआयएनचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला आहे.

  • 04 Jun 2024 05:25 PM (IST)

    दक्षिण मुंबईचा गड अरविंद सावंतांनी राखला

    दक्षिण मुंबईचा गड अरविंद सावंतांनी राखला; यामिनी जाधवांचा दारुण पराभव!

  • 04 Jun 2024 05:25 PM (IST)

    आतापर्यंत विजयी झालेले उमेदवार :::

    पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप)
    बारामती – सुप्रिया सुळे (शरदचंद्र पवार गट)
    मावळ – श्रीरंग बारणे (शिंदे गट शिवसेना)
    शिरूर – अमोल कोल्हे (शरदचंद्र पवार गट)
    शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)
    रायगड – सुनिल तटकरे (अजित पवार गट)
    मुंबई उत्तर पश्चिम – अमोल किर्तीकर (ठाकरे गट)
    अकोले – अनुप धोत्रे (भाजप)
    उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड (काँग्रेस)
    नाशिक – राजाभाऊ वाजे (ठाकरे गट)
    दिंडोरी – भास्कर भगरे (शरदचंद्र पवार गट)
    वर्धा – अमर काळे (काँग्रेस)
    बुलढाणा – प्रतापराव जाधव (भाजप)
    चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
    अमरावती – बळवंत वानखेडे (काँग्रेस )
    धाराशिव – ओमप्रकाश निंबाळकर
    पालघर – हेमंत सावरा (भाजप)
    रावेर – रक्षा खडसे (भाजप)
    रत्नागिरी- सिंधुदूर्ग - नारायण राणे (भाजप)
    नंदुरबार - गोपाल पाडवी (काँग्रेस)
    जळगाव – स्मित वाघ (भाजप)
    दक्षिण मध्य मुंबई – अनिस देसाई (ठाकरे गट)
    उत्तर मुंबई – पियुष गोयल (भाजप)
    कल्याण डोंबवली – डॉ.श्रीकांत शिंदे (शिंदे गट)
    ठाणे – नरेश म्हस्के (भाजप)
    सांगली – विशाल पाटील (अपक्ष)
    कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज (काँग्रेस)
    नागपूर – नितीन गडकरी (भाजप)

  • 04 Jun 2024 05:18 PM (IST)

    ओमराजे निंबाळकर यांनी मोडले सर्व रेकॉर्ड

    ओमराजे निंबाळकर यांना 2 लाख 95 हजार 288 मतांची विक्रमी लीड. ओमराजे यांना 6 लाख 74 हजार 812 मते तर अर्चना पाटील यांना 3 लाख 79 हजार 524 मते.

  • 04 Jun 2024 05:17 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

  • 04 Jun 2024 05:15 PM (IST)

    शिवराज सिंह चौहान यांनी रचला इतिहास!

    विदिशा मतदारसंघातून 8,20,868 मतांनी मिळवला विजय

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज