PCMC मध्ये दादा अन् पवार करणार महायुतीचा ‘गेम’; खास मोहऱ्यानेच बातमी फोडली
अजित पवारांनी सांगितले आहे की अंतिम बोलणं व्हायचं आहे. परंतु तसा विचार सुरू आहे. अजितदादांनी याबाबत आमचं मत देखील विचारलं.
राष्ट्रवादीत मोठी फूट अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील त्या त्या दोन्ही एकत्रच आहेत असंही तुम्ही ऐकलं असेल. अशीच एक बातमी आता समोर येत आहे. (Pawar) पिंपरी-चिंचवडमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युतीसाठी प्रस्ताव आला आहे. सुप्रिया सुळेंकडून तसा निरोप आला आहे. त्यांचं म्हणणं होतं की याबाबतचे अंतिम बोलणं पवारसाहेबांसोबत व्हायचे आहे. मात्र, ते दोन पावले मागे जायला तयार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करू. मात्र महायुतीसोबत कुठलेही गठबंधन करण्यास आम्ही तयार नाही.
पार्थ पवार व्यवहार रद्द करु शकत नाही, अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानियांची मागणी
अजित पवारांनी सांगितले आहे की अंतिम बोलणं व्हायचं आहे. परंतु तसा विचार सुरू आहे. अजितदादांनी याबाबत आमचं मत देखील विचारलं. आम्ही आपल्या मतांमध्ये फूट नको, असं म्हणत यासाठी सकारात्मकता दाखवली आहे.’, असं देखील बहल यांनी सांगितलं आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील पुण्यामध्ये बोलताना सांगितले की, अद्याप युती आणि आघाडीबाबत निर्णय झालेला नाही.
काही कार्यकर्त्यांचं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढाव्या असं मत व्यक्त केल्याचे सांगितले. मात्र, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे घेणार आहेत असे देखील भरणे यांनी सांगितले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने चंदगड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आहे. त्यांनी विकास आघाडी स्थापन करून भाजपच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.
