मी निवडणूक आयोगाची चूक म्हणणार नाही, पण …, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्ममंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Nagarparishad Election Result : राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर

  • Written By: Published:
Devendra Fadnavis On Nagarparishad Election Result

Devendra Fadnavis On Nagarparishad Election Result : राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याबाबात उच्च न्यायालायच्या नागपूर खंडापीठाने मोठा निर्णय दिला आहे. तर आता या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देत राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, जवळपास 25 ते 30 वर्ष त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आहे पण असं पहिल्यांदा घडतंय, घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत. त्यांचे निकाल पुढे चाललेल्या आहेत. खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी दिलेला निकाल तो सर्वांना मान्य करावे लागले. निवडणूक आयोग देखील स्वायत्त आहे पण यातून जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांचा एक प्रकारे भ्रमनिरास झालेला आहे आणि सिस्टीमच्या फेल्युअरमुळे त्यांची काही चूक नसताना अशा पद्धतीने काही गोष्टी होण्याचे योग्य नाहीत. मला वाटतं अजून फार निवडणुका निवडणूक आयोगाला घ्याचे आहेत, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आयोगाने सुधारणा केली पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकामध्ये असं होणार हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी निवडणूक आयोगाची चूक म्हणणार नाही, पण माझं मत असं आहे की जो काही कायदा आहे त्याचा चुकीचं इंटरप्रिटेशन करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला माहिती नाही पण त्यांनी अतिशय चुकीचे इंटरप्रिटेशन केले आहे. अनेक वर्ष आम्ही या निवडणुका लढवल आहोत त्यांचे नियम आम्हालाही माहिती आहे मीही अनेक वकिलांशी याबाबत सल्लामसलत केलेली आहे. ज्या ठिकाणी सर्व गोष्ट्र फॉलो झालेले आहेत अशा ठिकाणी कोणीतरी न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने त्याला दिलासाही दिला नाही तरीही तो न्यायालयात गेला म्हणून निवडणुका पुढे नेणं हे कोणत्याही तत्त्वात बसत नाही, हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे. मी माझी नाराजी कालही बोलून दाखवलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे. माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाही. माझी नाराजी ही कायदेशीर रित्या सर्व बाबी होत नाही याच्यावर आहे असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

राज्यातील काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत 20 नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया रद्द करत पुढे ढकलत 2 डिसेंबर रोजी होणारे मतदान 20 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती दिली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर करण्यात यावे अन्यथा याचा परिणाम 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानावर होणार अशी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडापीठाकडे दाखल करण्यात आली होती.

सर्वात मोठी बातमी, सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतमोजणी 21 डिसेंबरला

या याचिकेवर सुनावणी करताना आज खंडापीठाने मोठा निर्णय घेत राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे आदेश दिले आहे.

follow us