Download App

मुंबईतील 36 मतदारसंघांत विजयाचा गुलाल कोण उधळणार? वाचा एका क्लिकवर

  • Written By: Last Updated:

Assembly Election Result 2024 Mumbai Suburban District Updates :  मुंबईतील बहुतांश कल मुंबईकडे पाहायला मिळतोय. राज्याची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातंय. मुंबई उपनगर विधानसभा मतदारसंघाच्या निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 मतदारसंघांचे निकाल आज मुंबई कोणाकडे राहणार हे (Assembly Election Result 2024) निश्चित करणार आहे. मुंबई उपनगरात 26 मतदारसंघांमधून एकूण (Mumbai Suburban District) 315 उमेदवार रिंगणात होते. मुंबई उपनगर परिसरात जो पक्ष जास्त जागा जिंकणार त्याच पक्षाचं आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वर्चस्व राहणार आहे. यादृष्टीने मुंबई उपनगर परिसरातील 26 मतदारसंघाचा निकाल महत्त्वपूर्ण मानला जातोय. मुंबई उपनगरामध्ये विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपचे 12, शिवसेनेचे 9, काँग्रेसचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे मुंबई उपनगरात यंदा काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेरीस भाजपाचे उमेदवार आशिष शेलार यांची आघाडी आहे.  विक्रोळी विधानसभा मतदारसंघात सुनील राऊत आघाडीवर आहे. सना मलिक यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.

Maharashtra Assembly Election : मोठी बातमी! पहिला कल भाजपच्या बाजूने

यंदा मुंबई उपगनगरामध्ये मुख्य लढत ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपमध्ये आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्यादृष्टीने मुंबई उपनगरातील मतदारसंघ प्रतिष्ठेचे मानले जात आहेत. बोरिवली, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मानखुर्द शिवाजीनगर आणि वांद्रे पूर्व या मतदारसंघांत हायव्होल्टेज लढती झालेल्या आहेत. मुंबई शहरात 10 आणि मुंबई उपनगरात 26 असे एकूण 36 मतदारसंघ आहेत. आता मुंबईच्या राजकारणावर आगामी काळात कोणाचा पगडा राहणार, हे आजचा निकाल निश्चित करणार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘व्होट जिहाद’ हे मुद्दे कितपत प्रभावी ठरतता, हे पाहावं लागणार आहे.

मुंबई उपनगरात भाजप आठ ठिकाणी पुढे आहे. राज्यात भाजप सध्या 97 जागांवर पुढे आहे.

वांद्रे पूर्व मतदार संघांत ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत. त्यांनी ६६२ आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत झिशान सिद्धीकी यांना २१२९ मते मिळाली आहे तर वरूण सरदेसाई यांना २७२९ मते मिळाली आहे,

बातमी अपडेट होत आहे….

आठवण करून द्यावी म्हटलं; बाकी काही नाही, सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य काढलं उकरून 

मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी

विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव पक्ष
कुलाबा विधानसभा
मलबार हिल विधानसभा
मुंबादेवी विधानसभा
भायखळा विधानसभा
शिवडी विधानसभा
वरळी विधानसभा
माहीम विधानसभा
वडाळा विधानसभा कालिदास कोळंबकर विजयी भाजप
सायन-कोळीवाडा
धारावी विधानसभा
चेंबूर विधानसभा
अणुशक्ती नगर विधानसभा सना मलिक महायुती
वांद्रे पश्चिम विधानसभा
वांद्रे पूर्व विधानसभा
कलिना विधानसभा
कुर्ला विधानसभा
चांदिवली विधानसभा
विलेपार्ले विधानसभा
मानखुर्द-शिवाजीनगर
घाटकोपर पूर्व विधानसभा
घाटकोपर पश्चिम विधानसभा
भांडूप पश्चिम विधानसभा
विक्रोळी विधानसभा
मुलुंड विधानसभा
अंधेरी पूर्व विधानसभा
अंधेरी पश्चिम विधानसभा
वर्सोवा विधानसभा
गोरेगाव विधानसभा
दिंडोशी विधानसभा
जोगेश्वरी पूर्व विधानसभा
मालाड विधानसभा
चारकोप विधानसभा
कांदिवली विधानसभा
मागाठाणे विधानसभा
दहीसर विधानसभा
बोरिवली विधानसभा

 

follow us