Assembly Election Result : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election Result) निकालाची घोषणा सुरु आहे. राज्यातील अनेक भागात महायुतीच्याच उमेदवारांनी बाजी मारल्याचं दिसून येत आहे. अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातून सासरे आणि जावई दोघेही विधानसभेत जाणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. अहिल्यानगर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप तर राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले विजयी झाल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे संग्राम जगताप हे शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आहेत. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातून जावई आणि सासरे दोघेही विधानसभेवर गेले असल्याची चर्चा रंगलीयं.
कोपरगावमध्ये महायुतीचा गुलाल! आशुतोष काळे यांचा दणक्यात दुसऱ्यांदा विजय
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच अजित पवार गटाचे संग्राम जगताप हे आघाडीवर असल्याचं चित्र दिसून येत होतं. तर दुसरीकडे शिवाजीराव कर्डिले पहिल्या सात ते आठ फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. मात्र, पंधराव्या फेरीअखेरीस शिवाजीराव कर्डिले यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी मागे टाकून आघाडी घेतली. अद्यापही मतमोजणी सुरु असून 22 व्या फेरीअखेरीस शिवाजीराव कर्डिले हे 34 हजार 745 मतांनी आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे यांना 100114 मते मिळाली आहेत. कर्डिले यांना 1 लाख 34 हजार मते मिळाली आहेत. तर 20 व्या फेरीअखेर संग्राम जगताप 37 हजार 343 मतांनी आघाडीवर आहेत.
मानखुर्द शिवाजीमध्ये नवाब मलिकांना धक्का; चौथ्या फेरीत अबू आझमी पुढे
शिर्डीतून विखेंनीही बाजी मारली…
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला करिष्मा कायम ठेवलायं. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा दमदार विजय मिळवून ते विधानसभेत जाणार आहेत. शिर्डी मतदारसंघात महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील तर महाविकास आघाडीकडून प्रभावती घोगरे रिंगणात होत्या. तर राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष निवडणूक लढवली. तिरंगी लढतीत राधाकृष्ण विखे यांनी दोन्ही उमेदवारांना धूळ चारत पुन्हा एकदा आपला गड कायम राखलायं. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यावर विखे घराणेचा प्रभाव आहे, असं विखेंनी या विजयातून दाखवून दिलंय.
एकनाथ शिंदे निकालानंतर शरद पवारांसोबत जाणार का? संजय शिरसाट यांनी दिलं उत्तर
बाळासाहेब थोरातांचा पराभव…
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभव झाला आहे. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभव केला आहे. अमोल खताळ सायबर कॅफे चालवत होते. त्यांनी काही वेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षात देखील काम केले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना विखे समर्थक मानले जातात आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना शिंदे गटाकडून ऐनवेळी तिकीट मिळाले होती. महायुतीकडून या जागेसाठी माजी खासदार सुजय विखे इच्छुक होते.