WCL 2025 IND vs PAK Called Off : वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2025 च्या आयोजकांनी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणारा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी क्रिकेटपटू युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) नेतृत्वात इंडिया चॅम्पियन्सचा पुढील सामना येत्या 22 जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेशी (India vs South Africa) होणार आहे.
याबाबत वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्सच्या आयोजकांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. भारतीय खेळाडू आणि चाहत्यांच्या भावना दुखावल्या म्हणून माफीही मागितली आहे. चाहत्यांना काहीतरी चांगलं देता यावं इतकाच उद्देश यामागे होता असे WCL ने म्हटले आहे. WCL कडून नेहमीच क्रिकेटला प्राधान्य दिले जाते.
आमचा एकमेव उद्देश प्रशंसकाने काहीतरी चांगलं आणि काही आनंदाचे क्षण द्यावेत असा होता. आमच्या असं ऐकण्यात आलं होतं की पाकिस्तान हॉकी टीम यावर्षी भारतात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडेच एक व्हॉलीबॉल सामना देखील झाला होता. काही अन्य सामनेही झाले होते. त्यामुळे आम्ही हा सामना खेळवण्याच्या बाबतीत विचार केला होता, असे आयोजकांनी सांगितले.
Asia Cup 2025 पूर्वीच एसीसीला धक्का, BCCI ने घेतला मोठा निर्णय, रद्द होणार स्पर्धा?
परंतु, आमच्या या विचाराने असंख्य लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील. आम्ही अजाणतेपणाने भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांना त्रास दिला. यामुळे आता आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पुन्हा एकदा माफी मागतो. आम्ही फक्त क्रिकेट चाहत्यांना काही चांगले देण्याचा प्रयत्न करत होतो, असे WCL आयोजकांनी या निवेदनात म्हटले आहे.
Dear all , pic.twitter.com/ViIlA3ZrLl
— World Championship Of Legends (@WclLeague) July 19, 2025
युवराज सिंह (कर्णधार), सुरेश रैना, शिखर धवन, गुरकीरत सिंग, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, अभिमन्यू मिथून, हरभजन सिंग, पवन नेगी, पियूष चावला, सिद्धार्थ कौल, वरुण एरॉन आणि विनय कुमार.