विधानसभा निवडणूक भाजपसाठी ठरली गेम चेंजर! प्रमुख ‘पाच’ कारणे समोर…

विधानसभा निवडणूक भाजपसाठी ठरली गेम चेंजर! प्रमुख ‘पाच’ कारणे समोर…

Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Victory Reasons : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) मध्ये महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्याचबरोबर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची कामगिरीही उत्कृष्ट झालीय. लोकसभा निवडणुकीचा निकाल बदलण्यात महायुतीला यश मिळालं आहे. भाजपच्या कामगिरीमागे पाच प्रमुख कारणे (BJP Mahayuti Victory Reasons) आहेत. ती आपण जाणून घेऊ या.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. सर्व एक्झिट पोलचे निकाल फेटाळत महायुतीच्या यशाला उधाण आलंय. महायुतीच्या यशात एकनाथ शिंदे सरकारने आणलेल्या पाच योजनांचा मोठा वाटा आहे. लेक लाडकी योजनेला राज्यातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीला मतदान केल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीचा कल बदलण्यात महायुती सरकारच्या पाच योजनांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शिंदे सरकारने सुरू केली होती. ही योजना मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केली होती. त्यामुळे मध्य प्रदेशात भाजपला मोठे यश मिळाले. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रातही झाली. आजच्या निकालाने महाराष्ट्रातील लाडक्या बहीणी महायुती सरकारच्या बाजूने आहेत, हे स्पष्ट झालंय.

ऐतिहासिक विजय, जनतेने त्यांना जागा दाखवली; निकालानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

बटेंगे तो कटेंगे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला. बांग्लादेशातील हिंदूंच्या परिस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा केली. याचा मोठा परिणाम आजच्या निकालावर झालेला दिसत आहे. हिंदू मोठ्या प्रमाणावर एकवटले, त्यांनी महायुतीला मतदान केलं अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.

एक है तो सेफ है : योगी आदित्यनाथ यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक निवडणूक सभा घेतल्या. या प्रचार सभेत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेत बदल करून नवी घोषणा दिली. त्यांनी जाहीर केले की ‘एक है तो सेफ है’ ते सुरक्षित आहे, त्यामुळे हिंदूंचे मत एक असल्याचे निकालावरून दिसून येते.
सर्वसामान्य सायबर कॅफे चालकाने बाळासाहेब थोरातांचं राजकारण संपवलं; कोण आहेत अमोल खताळ?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : शिंदे सरकारने गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप योजना सुरू केली होती. यासाठी अर्थसंकल्पात 5,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना कंपन्यांमध्ये नोकरी देण्यात आली. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना 6 हजार रुपये, तर पदवीधर उमेदवारांना 10 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा फतवा : भाजपने गेल्या तीन-चार दिवसांत ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या फतव्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे हिंदू मत संघटित झाले. महाविकास आघाडी मुस्लिमांच्या तावडीत असल्याचा संदेश देण्यात भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यशस्वी झाल्याचं मत व्यक्त केलं जातंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube