Maharashtra Cabinet list : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) पानीपत केल्यानंतर आता राज्यात महायुतीचीच (Mahayuti) सत्ता येणार हे स्पष्ट झालं. दोन डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, महायुतीच्या नवीन सरकारमध्ये मंत्रिपद (Maharashtra Cabinet) मिळण्यासाठी भाजप (BJP), शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जोरदार लॉबिंग सुरु आहे. महायुतीत कोणा-कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता असतांनाच आता संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली.
6 आमदारांमागे 1 मंत्रिपद असा महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला असू असण्याची शक्यता आहे. भाजपचे 132 आमदार निवडणूक आल्यानं मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक 15 मंत्रिपदं मिळणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला 11 तर, अजित पवार गटाला 7 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. भापजकडून देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार यांच्यासह 15 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
शिंदे गटाकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. तर अजित पवार गटाकडून अजित पवार धनंजय मुंडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासह 7 नावांची चर्चा आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
1. देवेंद्र फडणवीस
2. गिरीश महाजन
3. रवींद्र चव्हाण
4. मंगल प्रभात लोढा
5. चंद्रशेखर बावनकुळे
6. आशिष शेलार
7. नितेश राणे
8. शिवेंद्रसिंहराजे भोसले
9. राहुल कुल
10.माधुरी मिसाळ
11. संजय कुटे
12. राधाकृष्ण विखे पाटील
13. गणेश नाईक
14. पंकजा मुंडे
15. गोपीचंद पडळकर
भाजपच्या या यादीत विजयकुमार गावित आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नावांचा समावेश नसल्यानं त्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे.
शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. उदय सामंत
2. शंभूराज देसाई
3. गुलाबराव पाटील
4. संजय शिरसाट
5. भरत गोगवाले
6. प्रकाश सुर्वे
7. प्रताप सरनाईक
8. तानाजी सावंत
9. राजेश क्षीरसागर
10. आशिष जैस्वाल
11. निलेश राणे
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. धनंजय मुंडे
2. अदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. हसन मुश्रीफ
5. धर्मरावबाबा आत्राम
6. अजित पवार
7. छगन भुजबळ