२०२२ वर्ष अब्जाधिशांसाठी वाईट वर्ष, 'या' लोकांची संपत्ती सर्वात घटली

२०२२ वर्ष अब्जाधिशांसाठी वाईट वर्ष, 'या' लोकांची संपत्ती सर्वात घटली

जगातील श्रीमंतांसाठी 2022 हे वर्ष चांगले गेले नाही. गेल्या वर्षी सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या संपत्तीत अब्जावधींची घट झाली आहे

मस्क यांच्या संपत्तीत यावर्षी 133 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

इलॉन मस्क यांची संपत्ती सध्या 137 अब्ज डॉलर आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. 

मस्क यांची जागा घेणारे बर्नार्ड अर्नॉल्ट 162 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. तर बर्नार्ड अर्नॉल्टच्या संपत्तीतही 15.9 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, बिनन्सचे संस्थापक झाओ चँगपेंग आणि मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत या वर्षी सुमारे 392 अब्ज डाॅलरची घट झाली आहे.