मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.

अभिनयाच्या जोरावर त्यांनी  स्वत:च एक स्थान निर्माण केलंय.

वयाची पन्नाशीतही त्या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात.

ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्रामवरील रील्समुळे कायम चर्चेत असतात.

ऐश्वर्या यांनी नुकतेच साडीत सुंदर लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटसाठी त्यांनी  केशरी रंगाची पैठणी साडी नेसली.

केशरी साडीवर ऐश्वर्यांनी निळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातला.

त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.