रेश्मा शिंदे ही छोट्या पडद्यावरील नावाजलेली अभिनेत्री आहे.

लगोरी - मैत्री रिटर्न्स मालिकेतून तिनं अभिनयात पदार्पण केले.

तिने आजवर अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं.

सध्या ती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करतेय.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोशूटसाठी रेश्माने केशरी रंगाची सुंदर साडी नेसली.

रेश्माने साडीतील लूकवर मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज घातला.

रेश्माच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.