सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी.
दमदार अभिनयाने तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.
अल्पावधीतच तिचा देशभरात मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.
वैदेही लवकरच संगीत मानापमान चित्रपटात झळकणार आहे.
वैदेही परशुरामी सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये वैदेहीने भगव्या रंगाचा डिझायनर ड्रेस घातला.
वैदेहीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय.