बॉलीवूडमध्ये ९०चं दशक गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे  माधुरी दीक्षित.

हिंदी कलाविश्वात ओळख निर्माण केल्यानंतर तिने मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.

२०१८ मध्ये बकेट लिस्ट हा सिनेमा घेऊन माधुरी मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

लाखो लोक माधुरी दीक्षितच्या स्टाइलचे आणि किलर स्माईलचे चाहते आहेत.

माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. आपले फोटो ती शेअर करते.

 आताही तिने गुलाबी रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.

तिचा या लूकमधील मोहक रुप आणि दिलेखेच अदा पाहून चाहते घायाळ झाले.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.