बॉलीवूडमध्ये ९०चं दशक गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित.
हिंदी कलाविश्वात ओळख निर्माण केल्यानंतर तिने मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.
२०१८ मध्ये बकेट लिस्ट सिनेमातून तिने मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
लाखो लोक माधुरी दीक्षितच्या स्टाइलचे आणि किलर स्माईलचे चाहते आहेत.
माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. आपले फोटो ती शेअर करते.
आताही तिने आकाशी रंगाची जाळीदार साडीतले फोटो शेअर केले आहेत.
तिचा या नव्या लुकने आता सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
माधुरीची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट ५ जानेवारीला प्रदर्शित होतोय.