या नेत्यामुळे हिवाळी अधिवेशनात सरकार अडचणीत

या नेत्यामुळे हिवाळी अधिवेशनात सरकार अडचणीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याचे मंत्री असताना नागपुरातील एक भूखंड ८३ कोटी रुपये किंमत असताना फक्त २ कोटी रुपयांना दिली असल्याची माहिती समोर आली.

त्यावर विरोधी पक्ष आक्रमक झाला. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सरकारकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार

कृषिमंत्री अब्दुल सत्तार

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर या अधिवेशनात सर्वाधिक आरोप झाले. सिल्लोड येथे झालेल्या कृषी महोत्सवात कृषी अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्याच्या कामाला लावलं आहे. त्याचबरोबर गायरान जमीन प्रकरणी त्यांच्यावर ताशेरे ओढलेत.

याबरोबर अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्याच्या देखील आरोप झाला आहे. यावर मोठा हंगामा झाला. मी दोषी असेन तर हायकोर्ट मला शिक्षा देईल, असं गंभीर आवाजात सत्तार यांनी त्यांच्यावरील आरोपांना उत्तर दिलं.

परिवहन मंत्री शंभूराजे देसाई

परिवहन मंत्री शंभूराजे देसाई

देसाई यांच्यावर महाबळेश्वर येथील जमिनीवर बेकायदेशीर बांधकामाचा आरोप करण्यात आला आहे. यावर निवडणूक आयोगाची फसवणूक आणि अवैध बांधकाम असे आरोप त्यांच्यावर झाले.

उद्योगमंत्री उदय सामंत

उद्योगमंत्री उदय सामंत

एका मद्यनिर्मिती कंपनीला 250 कोटींचा लाभ देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारचं नुकसान केल्याचा आरोप केला आहे.