अश्विनी महांगडे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तिने अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं.
अश्विनी महांगडे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
नुकतेच अश्विनीने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केलेत.
या फोटोत तिने लाल रंगाची भरजरी नऊवारी साडी नेसली.
नऊवारी साडीतील लूकवर अश्विनीने सुंदर दागिने परिधान केलेत.
या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
अश्विनीच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.