प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

डान्स असो, अभिनय असो किंवा सूत्रसंचालन प्राजक्ता जीव ओतून काम करते.

प्राजक्ताने दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले.

या फोटोत तिने फिकट हिरव्या  रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसतो.

लाईट मेकअपसह प्राजक्ताने गळ्यात नेकलेस, एअररिंग्स आणि केसात गजरा माळला.

आपले फोटो शेअर करत प्राजक्ताने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तिने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांनी हजारोंमध्ये लाईक्स आणि कॉमेंट्स केल्यात.