गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे.

आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकून आपलं स्थान निर्माण केलं.

'मोरया', 'पैसा पैसा' या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली.

‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’ या मालिकांतून ती घराघरांत पोहोचली

स्पृहा सोशल मीडियावर सक्रीय असते. ती फोटो, कविता शेअर करत असते.

आताही स्पृहाने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर काही फोटो शेअर केले.

यात स्पृहाने पांढरी साडी आणि  आकाशी रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज  घातला

हातात गजरा घेऊन ती वेगवेगळ्या पोज देतेय,  या साडीत तिचं सौंदर्य आणखी खुललंय