सावनी रविंद्र ही मराठी सिने आणि टीव्ही क्षेत्रातली आघाडीची गायिका आहे.

सावनीने आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.

तिने मराठीसह तेलुगू, मल्याळम, कन्नड, तामिळ भाषेतूनही  गाणी गायली.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात गाण्यांसाठी तिचं खूप कौतुक झालं.

सावनीला ‘बार्डो’ या चित्रपटातील गाण्यासाठी  राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

आपल्या गाण्यासोबतच क्लासी लूकमुळेही सावनी नेहमीच चर्चेत असते.

आताही तिने काळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर केलेत.

या साडीत  सावनी खुपच सुंदर दिसत असून चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.