सावनी रविंद्र सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करत असते.

सावनीने आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.

तिने मराठीसह तेलुगू, मल्याळम, कन्नड, तामिळ भाषेतूनही  गाणी गायली.

तिला ‘बार्डो’ या चित्रपटातील गाण्यासाठी  राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

आपल्या गाण्यासोबतच क्लासी लूकमुळेही सावनी नेहमीच चर्चेत असते.

आताही तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केलेत.

या ड्रेसमध्ये  सावनी खुपच सुंदर दिसत आहे. तिचं हसू लक्ष वेधून घेतंय.

फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.