फॅण्ड्री चित्रपटातील शालूचे कॅरेक्टर आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे.

शाळेत जाणारी, आपल्याच विश्वात रमणारी, सालस, सुंदर शालू त्यावेळी प्रत्येकाच्या मनाला भावली.

आता हीच शालू म्हणजे अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली.

राजेश्वरीचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहेत.

राजेश्वरीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

राजेश्वरी खरातच्या फोटोंवर चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

एका चाहत्याने जब्या उगाच काळ्या चिमणीची राख शोधत नव्हता अशी प्रतिक्रिया दिली.

राजेश्वरीने सिंहगड महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.