सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
सोनाली नेहमीच नवे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
आताही सोनालीने आपले काही फोटो इंस्ट्राग्रामवर शेअर केले.
या फोटोशूटसाठी सोनालीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली.
तिने नेसलेल्या पिवळ्या साडीवर गुलाबाच्या फुलांचं डिझाईन आहे.
या साडीमध्ये सोनाली खूपच सुंदर आणि कमाल दिसत आहे.
तिने हे फोटो दुबईतील काईट बीचवर क्लिक केले आहेत.
तिच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंटचा पाऊस होतोय.