एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान सुरू आहे.

हा सामना पाहण्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमींनी हजेरी लावली आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत वि. पाकिस्तान सामना सुरू आहे.

यावेळी कोहलीनं इतर खेळाडूंपेक्षा वेगळी जर्सी परिधान केली होती.

 विश्वचषक स्पर्धेत भारताची  खांद्यावर तिरंगी पट्टे असलेली जर्सी आहे.

पण कोहलीनं परिधान केलेल्या जर्सीवर असलेले तीन पट्टे पांढऱ्या रंगाचे होते.

चुकीची जर्सी घालतल्याचं लक्षात येताच कोहली मैदानातून बाहेर पडला.

त्यानं तिरंगी पट्टे असलेली जर्सी परिधान केली. त्यानंतर तो मैदानात परतला.