Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या असून महायुतीने अभूतपूर्व यश संपादन करत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला (MVA) दारुण पराभव झालाय. विरोधकांनी परभवाचे खापर ईव्हीएम (EVM) फोडत असल्याचे पाहायला मिळतं आहे. दरम्यान ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन तपासणी व पडताळणीचे अर्ज निवडणूक आयोगाकडे (Election Commission) मोठ्या प्रमाणात पराभूत उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये नेमका घोळ झालायं का याचे उत्तर पडताळणी नंतर समोर येणार आहे.
या जिल्ह्यातून एकही अर्ज नाही
विधानसभा निवडणूक लढलेल्या उमेदवाराने ईव्हीएम तपासणी व पडताळणीसाठी पाच जिल्ह्यातील एकही उमेदवाराणे अर्ज केला नसल्याचे समोर आले आहे. सिंधुदुर्ग, गडचिरोली, वर्धा, नंदुरबार व अमरावती या पाच जिल्ह्यातील एकाही उमेदवाराने ईव्हीएम तपासणी व पडताळणीसाठी अर्ज केलेला नाही. 31 जिल्ह्यांमधील 95 विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन च्या तपासणी व पडताळणीसाठी एकूण 104 अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आले आहेत.
एक लाख 486 मतदान केंद्रांपैकी 755 मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीवॅटची तपासणी करण्याची मागणी समोर आली आहे. ज्या उमेदवारांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तपासणी व पडताळणीसाठी अर्ज केले आहेत त्यांना तपासणीच्या तारखेआधी तीन दिवस अगोदर त्यांचा अर्ज मागे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. जर उमेदवाराने अर्ज मागे घेतला तर त्यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तपासणी व पडताळणीसाठी जमा केलेले शुल्क परत करण्यात येईल असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या मायक्रो कंट्रोलर बर्न मेमरीच्या तपासणी व पडताळणीसाठी ज्या ठिकाणी निवडणूक याचिका दाखल करण्यात आलेली नाही, अशा ठिकाणी त्या संचातील डेटा क्लिअर करण्यात येतो व त्यानंतर अभिरूप मतदान घेण्यात येते त्यावेळी सी.यु. मधील डेटा व व्हीव्हीपॅट मशीन मधील स्लिप यांची आकडेवारी जुळते की नाही याचे निरीक्षण करण्यात येते. जर ती आकडेवारी जुळत असेल तर संबंधित संचातील ईव्हीएमचे कामकाज योग्य प्रकारे चालले आहे, याची खात्री होते असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
रोहित, कोहली अन् पंत फ्लॉप…., स्टार्कने दिला भारताला धक्का, टीम इंडिया 180 धावांवर ऑलआऊट
ईव्हीएम पडताळणीसाठी यांनी केले अर्ज
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, कर्जत – जामखेडचे उमेदवार भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री राम शिंदे, मुंबईतील अणुशक्ती नगरमधील उमेदवार फहद अहमद, साकीनाका येथील काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री आरिफ नसीम खान, एकनाथ शिंदे यांच्या समोर उभे असलेले शिवसेना उ.बा.ठा. चे केदार दिघे, ठाणे शहरमधील उमेदवार राजन विचारे, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर,क्षितिष ठाकूर या प्रमुख पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तपासणी व पडताळणीसाठी अर्ज केले आहेत.