Download App

Government Schemes : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना

Government Schemes : फळझाडांना, पालेभाज्या पिकांना सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म (Plastic film)असते. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते. तसेच पिकामध्ये तणांची वाढ देखील ही त्यामानाने कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा (Plastic mulching paper)उपयोग फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिके घेताना केला जातो. (Plastic Mulching Subsidy Scheme under National Horticulture Mission)

Mirzapur 3: तीन वर्षांनंतर चाहत्यांना पुन्हा ‘गुड्डू भैय्या’ची झलक दिसणार, शेअर केला व्हिडिओ…

प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान किती?
– अनुदान हे सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 32 हजार रुपये या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 16 हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दिले जाते.
– डोंगराळ क्षेत्र असेल तर प्रति हेक्टर हे 36,800 रुपये मापदंड असणार आहे. या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 18, 400 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेसाठी अनुदान दिले जाते.

मोठी बातमी : माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा!

प्लास्टिक मल्चिंग पेपरचे लाभ कोणते?
– वनस्पतींची मुळे चांगली वाढतात.
– शेतातील मातीची धूप रोखते.
– तणापासून संरक्षण
– शेतात पाण्याचा ओलावा कायम राखते, बाष्पीभवन रोखते.
– बागवानीमध्ये तण नियंत्रित करते आणि वनस्पतींसाठी दीर्घ काळापासून संरक्षण करते.
– हे जमीन कडक होण्यापासून वाचवते.

आवश्यक पात्रता काय?
– शेतकरी
– बचत गट
– शेतकरी उत्पादक कंपनी
– शेतकरी समूह
– सहकारी संस्था या योजनेमध्ये सहभागी होऊन अर्थसहाय्य घेऊ शकतात.

आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्डची झेरॉक्स
– आधार संलग्न असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स
– सातबारा उतारा
– 8 अ प्रमाणपत्र

अर्ज कुठे करावा?
या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us

वेब स्टोरीज