OTP Scam : आपल्या देशात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात युपीआयच्या (UPI) मदतीने आर्थिक व्यवहार होत आहे. त्यामुळे ओटीपीच्या नावाखाली फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ओटीपीच्या (OTP Scam) नावाखाली तुम्ही तुमची आयुष्यभराची कमाई गमावू शकता. त्यामुळे आता सरकारकडून आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
OTP घोटाळ्याची सूचना केंद्र सरकारच्या सायबर सिक्युरिटी एजन्सीने (CERT-In) नागरिकांना OTP घोटाळ्यांच्या वाढत्या धोक्याबद्दल अलर्ट जारी केला आहे. CERT-In ने X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये यूजर्सला ओटीपी फसवणुकीपासून सावध राहण्यास सांगितले आहे. याच बरोबर सायबर सिक्युरिटी एजन्सीने मोबाईल यूज़र्सला यापासून दूर राहण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.
OTP फसवणूक काय आहे?
आर्थिक फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्सनी ओटीपीद्वारे फसवणुकीचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ज्यामध्ये स्कॅमर्स यूजर्सकडून ओटीपी मिळवतात आणि या ओटीपीच्या मदतीने क खाते, डिजिटल वॉलेट किंवा इतर संवेदनशील माहितीसाठी अक्सेस घेतात. स्कॅमर बँक अधिकारी, सरकारी एजन्सीचे प्रतिनिधी म्हणून कॉल किंवा मेसेज करतात आणि एकदा ओटीपी शेअर केल्यावर, स्कॅमर तुमच्या बँकेला सहज काढून टाकू शकतात.
Safety tip of the day: Beware of OTP frauds.#indiancert #cyberswachhtakendra #staysafeonline #cybersecurity #besafe #staysafe #mygov #Meity #onlinefraud #cybercrime #scamming #cyberalert #CSK #CyberSecurityAwareness pic.twitter.com/sXFbs3YPhY
— CERT-In (@IndianCERT) September 13, 2024
OTP फसवणूक कशी टाळायची
CERT-In ने X वर OTP घोटाळे टाळण्यासाठी काही टिप्स दिली आहे. वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती फोनवर किंवा ऑनलाइन शेअर करणे टाळा. अधिकृत बँका किंवा कंपनीच्या वेबसाइटशी संपर्क साधून कॉल किंवा मेसेजची सत्यता पडताळून पाहा. रिवॉर्ड किंवा कॅशबॅक ऑफरच्या बदल्यात कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत OTP कधीही शेअर करू नका.
फॉर्म्युला ठरला, महायुतीमध्ये जागावाटपावर तिन्ही नेते एकमत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…