Download App

अमेरिकेने भारतालाही सोडलं नाही; 26 टक्के टॅरिफ कराचा भारतातील ‘या’ उद्योगांना फटका बसणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) जगभरातील देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ गुरुवारपासून लागू केला आहे.

Donald Trump Reciprocal Tariff Impact on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) जगभरातील देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ गुरुवारपासून लागू केला आहे. ट्रम्प यांनी या कराला डिस्काउंटेड टॅरिफ असे नाव दिले आहे. यात भारतावर 26 टक्के टॅरिफ आकारला जाणार आहे. याबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिकेत आले होते. मोदी माझे चांगले मित्र आहेत. पण या दौऱ्यात मी त्यांना स्पष्ट सांगितलं की तु्म्ही आमच्याबरोबर योग्य व्यवहार करत नाही. भारत अमेरिकेकडू 52 टक्के टॅरिफ वसूल करतोय. म्हणून आता आम्ही भारतावर 26 टक्के टॅरिफ आकारणार आहोत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारतावर नक्कीच परिणाम होणार आहे. एक्सपर्ट्सनुसार भारतातून निर्यात होणाऱ्या काही वस्तूंना जास्तीच्या आयात शु्ल्काचा सामना करावा लागू शकतो. SBI च्या एका रिपोर्टनुसार भारतावर फार परिणाम होणार नाही. यामुळे निर्यातीत 3 ते 3.5 टक्के घट होण्याची शक्यता आहे. निर्माण आणि सेवा क्षेत्रातील वाढत्या निर्यातीमुळे परिणाम कमी होईल. युरोप मध्य पूर्व अमेरिकेच्या माध्यमातून नवे व्यापारी मार्ग तयार केले जात आहेत. तसेच भारताने आपल्या निर्यातीत जास्त विविधता आणली आहे. या गोष्टी पाहिल्या तर रेसिप्रोकल टॅरिफचा जास्त परिणाम होणार नाही असे तज्ज्ञांना वाटते.

ज्याची भीती होती ते घडलंच! भारतावर 26 तर चीनवर 34 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ; ट्रम्प यांचा निर्णय…

या निर्णयाचा सर्वाधिक फटका कापड, परिधान आणि ज्वेलरी उद्योगाला बसू शकतो. 2023-24 मध्ये भारतातून 3 लाख कोटींच्या कापडाच्या निर्यातीत अमेरिकेची 28 टक्के भागीदारी होती. या क्षेत्रात अमेरिके बरोबर भारताच्या व्यापारात वाढ दिसून आली आहे. 2016-17 आणि 2017-18 मध्ये अमेरिकेचा कापड निर्यातीत 21 टक्के हिस्सा होता. 2019-20 मध्ये 25 टक्के आणि 2022-23 या वर्षात हा हिस्सा 29 टक्क्यांपर्यंत पोहोचला. दोन्ही देश या वर्षात एक व्यापारी करार करण्याचे नियोजन करत आहेत. 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत व्यापार घेऊन जाण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

भारतावर काय परिणाम होणार

भारताच्या निर्यातीत 3 ते 3.5 टक्के घटीची शक्यता.

कापड आणि ज्वेलरी उद्योगावर सर्वाधिक परिणामाची शक्यता.

2023-24 मध्ये भारतातून 3 लाख कोटींच्या कापडाच्या निर्यातीत अमेरिकेची 28 टक्के भागीदारी

भारतीय स्टील आणि अॅल्यूमिनियम निर्यातीला फटका बसणार

भारत-अमेरिकेचा व्यापार

2024 मध्ये भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात 74 अब्ज डॉलर्सची होती.

यात मोती, रत्ने, दागिने 8.5 अब्ज डॉलर्स, औषधनिर्माण उद्योग 8 अब्ज डॉलर्स तर पेट्रोकेमिकल्स उत्पादनांचा 4 अब्ज डॉलर्सचा वाटा होता.

कृषी साहित्य, मौल्यवान धातू, रसायने, औषधे, वैद्यकीय उपकरणे, विद्यूत घटक, यंत्रसामग्री, मासे, मांस, फ्रोजन फुड, सीफूड, कोळंबी, साखर, कोको, ऑटो क्षेत्रातील वस्तूंच्या निर्यातीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

follow us