Maharashtra IPS Transfer : राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात आठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. गुरुवारी तब्बल 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक बदलले गेले आहेत. अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला (
Rakesh Ola) यांची मुंबईत पोलिस उपआयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge ) यांची अहिल्यानगरला बदली झाली आहे.
पुण्यातून आंचल दलाल यांची रायगडचे एसपी म्हणून बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित यांची ठाणे शहरात बदली झाली आहे. तर योगेश कुमार गुप्ता यांची नांदेडहून कोल्हापूरला पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांची नागपूरला, नागपूर शहराचे पोलिस उपआयुक्त अर्चित चांडक यांची अकोला पोलिस अधीक्षक, मुंबईतून महेश शिंदे यांचे नागपूर लोहमार्ग पोलिस अधीक्षक म्हणून बदली झालीय.
तर कायदा व सुव्यवस्थेचे सहायक पोलीस महानिरीक्षक राजतिलक रोशन यांची मुंबईत बदली झाली आहे.
बाळासाहेब पाटील नाशिकचे एसपी
पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे आता नाशिक ग्रामीणचे प्रमुख असणार आहेत. गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख हे आता पालघरचे पोलिस अधीक्षक असणार आहेत. सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर मोहन दहिसर हे सिंधुदुर्गचे एसपी असणार आहेत.
बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांची राज्य राखीव पोलीस बल अमरावती येथे बदली झाली आहे. तर निलेश तांबे हे बुलढाण्याचे एसपी असणार आहेत. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची सातारा येथे बदली झाली आहे. तर लातूरचे सोमय मुंडे यांची छत्रपती संभाजीनगरला पोलिस उपआयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर जयंत मिना हे लातूरचे एसपी असणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगरचे उपायुक्त नितीन बगाटे हे रत्नागिरीचे प्रमुख असणार आहे. तर रितू खोकर हे धाराशिवचे प्रमुख असणार आहेत.