Download App

मुंबईच्या ‘बारम’ने मिळविला अहमदनगर महाकरंडक

अहमदनगर : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळख असलेली ‘अहमदनगर महाकरंडक २०२३’ ही एकांकिका स्पर्धा सावेडीतील माऊली सभागृहात उत्साहात झाली. यात तरुणाईचा मोठ्या उत्साह व जल्लोष पहायला मिळाला. यावेळी मुंबईतील महर्षी दयानंद कॉलेजच्या ‘बारम’ या एकांकिकेने प्रथम तर मुंबईच्याच गुरुनानक खालसा स्वयत्त महाविद्यालयाच्या ‘काही तरी अकडलंय’ या एकांकिकेने द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्या संघाला १ लाख ५१ हजार १११ रुपये आणि उपविजेत्या संघाला १ लाख ११ हजार १११ रुपये पारितोषिक मिळालं.
 
हौशी रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणाऱ्या या एकांकिका स्पर्धेचं यंदाचं हे दहावं वर्ष होतं. तर कलर्स मराठी वाहिनीचा सहयोग यंदाच्या अहमदनगर महाकरंडक २०२३ एकांकिका स्पर्धेला लाभला होता. याशिवाय कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांमधील काही कलाकारांनी हजेरी लावत स्पर्धेची शोभा आणखी वाढवली. अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद फिरोदिया, कलर्स मराठी वाहिनीचे बिझनेस हेड विराज राजे, दिग्दर्शक केदार शिंदे, आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावर्षी अहमदनगर महाकरंडक २०२३ एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, दिग्दर्शक – अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं.
 
चार दिवस रंगलेल्या या स्पर्धेविषयी बोलताना अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, “जेव्हा महाकरंडकला सुरुवात झाली तेव्हा माझ्या पहिल्या भाषणात मी म्हटलं होतं की या रंगमंचावरून कुणाला मालिका, टेलिव्हिजन, चित्रपटात नवी संधी मिळाली तर ती आमच्यासाठी फार मोठी गोष्ट असेल. आणि आता या दहा वर्षांत अनेक कलाकार या महाकरंडकमधून तयार झालेत.”

शंभरहून अधिक एकांकिका, आठ केंद्र, हजारो कलाकार, तितकेच तंत्रज्ञ, लक्षवेधी पारितोषिक वितरण समारंभ असलेला हा चार दिवसांचा महोत्सव स्पर्धकांचा उत्साह, जल्लोष, नाट्यरसिकांच्या टाळ्या, मान्यवरांची उपस्थितीत जल्लोषात पार पडला.  अवघ्या दहा वर्षांत या स्पर्धेने महाराष्ट्रातच नाही तर देशात आणि देशाबाहेरही आपला लौकिक पोहोचवला आहे. मुख्य म्हणजे या स्पर्धेने फक्त कलाकारांना त्यांचं हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं नाही तर कलाकारांना आपली स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची संधी दिली. या स्पर्धेतून एकांकिका सादर केलेले अनेक कलाकार सध्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक असून त्यांनी मनोरंजन क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, मिताली मयेकर, अद्वैत दादरकर, शिवराज वायचळ, पार्थ भालेराव, सखी गोखले, ओंकार राऊत, योगेश शिरसाट या आणि इतर अनेक कलाकारांनी या स्पर्धेतून आपली कला सादर केली. अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित, आय लव्ह नगर आणि लेट्स अपच्या संयुक्त विद्यमाने आणि कलर्स मराठी वाहिनीच्या सहयोगाने ही स्पर्धा या वर्षी देखील लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरली.

स्पर्धेचा निकाल
सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका – नाना थोडं थांबा ना…! (अंतरा प्रॉडक्शन्स, अहमदनगर)
सर्वोत्कृष्ट एकांकिका
प्रथम क्रमांक – बारम ( महर्षी दयानंद कॉलेज, मुंबई) 
द्वितीय क्रमांक – काहीतरी अकडलंय… (गुरुनानक खालसा स्वायत्त महाविद्यालय, मुंबई) 
तृतीय क्रमांक – उकळी (रंगसंगती, ठाणे)
चतुर्थ क्रमांक – लेखकाचा कुत्रा (मिलाप थिएटर्स, पुणे) 
उत्तेजनार्थ –  जिन्याखालची खोली (कलाश थिएटर्स, मुंबई)
विशेष लक्षवेधी एकांकिका – जंगल जंगल बटा चला है (परिवर्तन कला फाऊंडेशन, कोल्हापुर)
परीक्षक शिफारस एकांकिका – गोदा (माय नाटक कंपनी, पालघर)

परीक्षक शिफारस एकांकिका – अवघडीचे ५ दिवस (ओम आर्टस्, नाशिक)
———
दिग्दर्शन
प्रथम क्रमांक (वैयक्तिक) –  यश पवार व ऋषिकेश मोहिते (बारम)
द्वितीय क्रमांक – अमित पाटील (काहीतरी अडकलंय…)
तृतीय क्रमांक –  महेश कापरेकर व सागर चव्हाण (जिन्याखालची खोली)
उत्तेजनार्थ – अनिकेत मोरे (गोदा)
उत्तेजनार्थ –  अजय पाटील (डोक्यात गेलंय)

अभिनेता 
प्रथम क्रमांक – प्रणव जोशी (लेखकाचा कुत्रा)
द्वितीय क्रमांक – देवेन कोळंबकर व अशोक अनिवसे (बारम)
तृतीय क्रमांक – अजय पाटील (डोक्यात गेलंय)
उत्तेजनार्थ – राघवेंद्र कुलकर्णी (असाही एक कलावंत)
उत्तेजनार्थ – अनिकेत मोरे (गोदा)
उत्तेजनार्थ –  महेश कापरेकर (जिन्याखालची खोली)

सह अभिनेता 
प्रथम क्रमांक – नीलेश माने (लेखकाचा कुत्रा)
विनोदी अभिनेता प्रथम – कान्हा तिवारी (नाना थोडं थांबा ना…)

अभिनेत्री 
प्रथम – निकिता घाग (फ्लाईंग राणी)
द्वितीय – डॉ. ज्युईली टेमकर (मेन ईन ब्लॅक)
तृतीय – सानिका देवळेकर (डोक्यात गेलंय)
उत्तेजनार्थ – अमृता आमडोसकर (गोदा)
उत्तेजनार्थ – रोशनी मोढे (जिन्याखालची खोली)

सहअभिनेत्री 
प्रथम क्रमांक – रश्मी सांगळे (उकळी)
विनोदी अभिनेत्री – विजया गुंडप (आखाडा)

प्रकाश योजना 
प्रथम क्रमांक – श्याम चव्हाण (बारम)
द्वितीय क्रमांक – संकेत पारखे (असाही एक कलांवत)
तृतीय क्रमांक – ओंकार येंडे (गोदा)

संगीत 
प्रथम क्रमांक – श्रीनाथ म्हात्रे व आयुष पवार (जिन्याखालची खोली) 
द्वितीय क्रमांक – वैभव काळे व मधुरा तरटे (अवघडीचे ५ दिवस)
तृतीय क्रमांक – तृप्ती सोनवणे व प्रणव रांगडे (गोदा)

रंगभूषा 
प्रथम क्रमांक – निरंजन मगईन व वैष्णवी पेडकर (जंगल जंगल बटा चला है)
द्वितीय क्रमांक –  (अवघडीचे ५ दिवस)

वेशभूषा 
प्रथम क्रमांक – रितीका राजे (जंगल जंगल बटा चला है )
द्वितीय क्रमांक – (अवघडीचे ५ दिवस)

नेपथ्य 
प्रथम क्रमांक – विशाल भालेकर (फ्लाईंग राणी)
द्वितीय क्रमांक – दिप्ती साळुंके व विनायक परदेशी (लेखकाचा कुत्रा)
तृतीय क्रमांक – संपूर्ण नाट्यस्पर्श मंडळ (प्रवास)

लेखन 
प्रथम क्रमांक – विशाल कदम (लेखकाचा कुत्रा)
द्वितीय क्रमांक – सिध्देश साळवी (काहीतरी अडकलंय)
तृतीय क्रमांक – चैतन्य सरदेशपांडे (उकळी)
चतुर्थ क्रमांक – अजय मच्छिंद्रनाथ पाटील (डोक्यात गेलंय)

Tags

follow us