दिशा सालियन प्रकरणात 1 लाख कोटींच्या मानहानीचा दावा ठोकणार; अॅड. निलेश ओझा

सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिशाचे वडील सतिश सालियन यांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन थेट न्यायाधीशांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

Disha Salian

Disha Salian

Disha Salian Case : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दिशा सालियन प्रकरणी वडिल सतिश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल संशय असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी नवनवीन दावे प्रतिदावे केले जात आहेत. आता सतिश सालियन यांच्या वकीलांकडून न्यायमूर्तींच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून आपण 1 लाख कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेत दिलीयं. विशेष म्हणजे या दाव्यातील रक्कम लाडकी बहीण योजना आणि इमानदार पत्रकारांसाठी खर्च करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं! सेन्सेक्स धडामधूम…निफ्टी 23,150 च्या आसपास, ‘हे’ शेअर्स सर्वात जास्त घसरले

निलेश ओझा म्हणाले, आमच्याकडून सुनावणीची पूर्ण तयारी झाली आहे, मात्र उद्या सुनावणीत काही होण्याची शक्यता कमी आहे. कारण, ज्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे, त्यांच्याविरोधातच आमची तक्रार आहे, असे सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी म्हटले. न्यायमूर्तींची सख्खी बहीण वंदना चव्हाण सक्रिय राजकारणी असून त्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षात आहेत. त्यामुळे, विविध कारणांमुळे उद्या हे प्रकरण न्यायालयाकडूनच दुसऱ्या खंडपीठासमोर घेऊन जा, असं सांगितलं जाण्याची शक्यता आहे, असा आरोपच निलेश ओझा यांनी केला आहे.

दिशा सालियन प्रकरणात दिशाचे वडील सतीश सालियन यांनी 1 लाख कोटींच्या मानहानीचा दावा तयार केला आहे. विशेष म्हणजे या दाव्यातून मिळणारी 90 टक्के रक्कम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस अनुदान म्हणून देणार असल्याची घोषणाच सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी केली आहे. तर, 1 लाख कोटी रुपयांच्या मानधनातील उर्वरित 9 टक्के रक्कम इमानदार पत्रकारांसाठी खर्च करणार असून केवळ 1 टक्का रक्कम सतीश सालियन स्वत:कडे ठेवणार आहेत, अशी माहितीही निलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, दिशा सालियन प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरू आहेत. दिशाच्या शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू अपघाताने डोक्याला मार लागूनच झाल्याचे म्हटलं आहे. तर, दिशा सालियानच्या मृत्यूवरून आरोप होत असतानाच दिशा सालियानने वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसा देऊन थकली होती. कष्टानं कमावलेला पैसा नको त्या बाबींसाठी खर्च होत असल्याने दिशाने याबाबत मित्रांशी सुद्धा बोलणं केलं होतं. याच आर्थिक तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्येही दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं. मात्र, हे सर्व तत्कालीन सरकारच्या दबावातून फेरफार करुन बनवण्यात आल्याचे सतिश सालियन यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.

Exit mobile version