Aaditya Thackeray Relief In Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांना (Aaditya Thackeray) मोठा दिलासा मिळाला आहे. दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला हायकोर्टाने दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. याप्रकरणी 2 जुलै रोजी न्यायमूर्ती अजय गडकरी अन् राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी (Disha Salian Case) झाली. याप्रकरणी हायकोर्टानं राज्याच्या मुख्य सचिवांना उत्तर देण्याचे आदेश दिलेले आहेत, असं असतानाही मालवणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी उत्तर दिल्याची बाब याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली.
आदित्य ठाकरे मुख्य आरोपी?
या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. तिच्यावर सतीश सालियन यांच्यावतीनं वकील निलेश ओझा यांनी कोर्टात उत्तर दाखल केलंय. ज्यामध्ये आदित्य ठाकरे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे त्यांना यात याचिका दाखल करण्याचा अधिकारच नाही. त्यांची याचिका फेटाळून लावण्याची विनंती करण्यात आलीय.
Bacchu Kadu Exclusive : तेव्हा सांगितलं असतं तर, फडणवीस तोंडावर पडले असते…
याचिका फेटाळण्याची विनंती मुंबई पोलिसांकडून करण्यात आलीय. तपासाची प्राथमिक फेरी याप्रकरणी पूर्ण झालीय. तर दिशाचा मृत्यू अपघाती असून, यात कोणताही घातपात किंवा हत्येचा प्रयत्न झालेला आढळून आलं नाही. म्हणून दिशाच्या मृत्यूची अपघाती नोंद करत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नाही, असं सांगत मालवणी पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलंय. तसेच याचिका फेटाळून लावण्याची विनंती हायकोर्टाकडे केलीय.
छाती ठोकून सांगतो, होय…गुवाहाटीला गेलो; बच्चू कडूंनी केला खळबळजनक खुलासा
सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब
यासंदर्भात सीबीआय तपासाची भूमिका स्पष्ट करण्याकरिता अजून थोडा अवधी देण्यात यावा, अशी विनंती सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती स्वीकारत हायकोर्टाने राज्य सरकारच्या विनंतीवर प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. त्यामुळे आता याबाबत त्यांची काय भूमिका आहे? यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची अनेक समीकरणं अवलंबून आहेत.
दिशा करिअरसाठी खूप गंभीर होती, तिने अशी आत्महत्या करणं शक्य नाही. माझ्या मुलीचा मृत्यू अपघाती झाल्याचं मला भासविण्यात आलं. परंतु तिचा मृ्त्यू अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मालवणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ते सांगत असलेली गोष्टच खरी असल्याचं सांगत पुढे रेटलं. त्यांनी माझ्या कुटुंबाला दबावाखाली अन नजरकैदेत ठेवलं. तर आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती, असा आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केलाय.