Disha Salian Case : आदित्य असं काही करेल असं वाटत नाही; पुतण्यासाठी काकू मैदानात

Disha Salian Case : आदित्य असं काही करेल असं वाटत नाही; पुतण्यासाठी काकू मैदानात

Disha Salian Case : दिशा सालियान आत्महत्या (Disha Salian Case) प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्या चौकशीसाठी SIT ची स्थापना झाली आहे. या प्रकरणी एसआयटी (SIT) चौकशी स्थापन करण्याचे राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई पोलिसांना (Mumbai Police) देण्यात आला आहे. त्यावर राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य यांच्या काकू शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्या आदित्या यांच्या बाजूने ठाकपणे उभे राहिल्याचं पाहायला मिळालं.

शर्मिला ठाकरेंचं मोठं वक्तव्य…

आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात येत असलेल्या दिशा सालियान आत्महत्या (Disha Salian Case) प्रकरणाबद्दल शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, ‘मला असं काही वाटत नाही. की, आदित्य असं काही करेल. चौकशा काहीही लावल्या जातील. आम्ही देखील यातून खुपदा गेलो आहोत.’ असं म्हणत यावेळी शर्मिला यांनी आदित्य यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तसेच त्या आदित्य ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

कुणी 70 कोटी तर कुणी 4 लाख; ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन

दरम्यान विरोधी बाकावरील नेत्यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आवाज उठवत आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्याचे बघायला मिळाले होते. नुसते आरोपच नाहीतर त्यांची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील जोर लावून धरली होती. त्यानंतर राज्य सरकार या प्रकरणी पुन्हा एकदा पाऊलं उचलताना बघायला मिळत आहे. त्यामुळे आता दिशा सालियान या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दाऊदच्या हस्तकासोबत ठाकरेंचा शिलेदार; राणेंचे आरोप अन् फडणवीसांनी घोषित केली SIT

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूत(Sushant Singh Rajput) याचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्याआधी दिशा सालियान (Disha Salian) हिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी सुशांतसिंह राजपूत त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. या सगळ्या प्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांकडून वारंवार आरोप केले जात होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube