Karnatak Election 2023 : या ‘सहा’ कारणांमुळे झाला भाजपचा पराभव

Karnatak Election 2023 : या ‘सहा’ कारणांमुळे झाला भाजपचा पराभव

Karnatak Election 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. सध्या काँग्रेसच्या १३६ जागा तर भाजप ६४ जागांवर आहे. कर्नाटकमध्ये भाजपा सत्तेवर होती. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपच्या पराभवाची काय कारणे ते आपण थोडक्यात पाहुयात.

कर्नाटकमध्ये भाजपच्या पराभवाची कारणे

कर्नाटकमध्ये मजबूत चेहरा नाही- कर्नाटकमध्ये मजबूत चेहरा नसणे हे भाजपच्या पराभवाचे एक कारण आहे. येदियुरप्पा यांच्या जागेवर बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. पण मुख्यमंत्री असताना बोम्मई यांना कोणताही खास प्रभाव पाडता आला नाही. तर याऊलट काँग्रेसकडे राज्य पातळीवरील डीके शिवकुमार, सिद्धारमैय्या यांच्यासारखे मजबूत चेहरे होते. बोम्मई यांना पुढे करुन निवडणूक लढवणे भाजपला महागात पडले.

भ्रष्टाचार- भाजपच्या पराभवाच्या मागे भ्रष्टाचार हा एक प्रमुख मुद्दा आहे. काँग्रेसने भाजपच्या विरोधात ४० टक्के सीएम करप्शन असा अजेंडा राबविला होता. करप्शनच्या मुद्द्यावरच एस ईश्वरप्पा या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता. तर एक भाजप आमदाराला जेलमध्ये जावं लागलं होतं. स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने पंतप्रधानांनादेखील याची तक्रार केली होती. निवडणुक प्रचामध्ये हा मुद्दा भाजपसाठी गळ्यातील फास झाला होता व याचे उत्तर भाजपकडे नव्हते.

कर्नाटकात कॉंग्रेसची विजयी घोडदौड; डीके शिवकुमार भावूक; म्हणाले, ‘हा अखंड कर्नाटकचा…’

राजकीय समीकरणांचा फटका- कर्नाटकमध्ये भाजप आपले राजकीय समीकरण साधू नाही शकली. भाजपला इथे आपली कोर वोट बँक असलेल्या लिंगायत सुमदायाच्या लोकांना आश्वस्त नाही करता आले. तसेच दलित, आदिवासी, ओबीसी व वोक्कालिंगा समाजाचा पाठिंबा मिळवण्यात भाजप अपयशी ठरली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने दलित, मुस्लिम, ओबीसी यांच्यासह लिंगायत समाजातील लोकांना सोबत घेण्याच्या प्रयत्नात यश मिळवले.

जनतेने ध्रुवीकरणाला नाकारले- कर्नाटकमध्ये एक वर्षाभरापासून भाजपचे नेते हलाला, हिजाब, अजान अशा मुद्द्यांवर भाष्य करत होते. ऐन निवडणुकीच्यावेळी बजरंगबली एंट्री देखील झाली. काँग्रेसने बजरंग दलावर बंदी आणण्याचे वचन दिले. यानंतर भाजपने हा वाद थेट बजरंग बलीसोबत जोडला व देवाचा अपमान केला असे सांगितले. पण भाजपला याचा फायदा देखील नाही झाला.

Karnataka Election : माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला अपक्षाने फोडला घाम; ‘या’ मतदारसंघात काट्याची टक्कर

येदियुरप्पासारख्या दिग्गजांना साइड लाइन करणे महागात पडले- कर्नाटकमध्ये भाजप उभी करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणारे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यावेळी निवडणुकीतून साइड लाइन होते. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी भाजपने तिकीट नाकारले. यानंतर दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. येदियुरप्पा, शेट्टर, सावदी हे तिन्ही नेते लिंगायत समुदायाचे महत्वाचे नेते मानले जातात.

सरकारच्या विरोधातील नाराजी दूर नाही करु शकले- कर्नाटकमध्ये भाजप सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी होती. या नाराजीला दूर करण्याला भाजप असमर्थ ठरली. भाजपच्या सत्तेच्या विरोधात विरोधी पक्ष मजबूत ठरला. ज्याला उत्तर द्यायला भाजप असमर्थ ठरली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube