अजित पवारांचा घातपात ? चौकशीच्या मागणीसाठी आज ‘हे’ गाव बंद राहणार
Ajit Pawar Plane Crash Case : दिवंगत नेते अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथे एका विमान अपघाता निधन झाल्यानंतर या प्रकरणात
Ajit Pawar Plane Crash Case : दिवंगत नेते अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथे एका विमान अपघाता निधन झाल्यानंतर या प्रकरणात अनेक दावे करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांनी तीन वेळा पत्रकार परिषद घेत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. तर आता अजित पवार यांच्या अपघाताचा तपास व्हावा या मागणीसाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर हे गाव रविवारी बंद असणार आहे. याबाबत पोलीस निरीक्षकांना लोणी भापकर ग्रामपंचायतीने पत्र लिहिले आहे.
अजित पवार यांच्या निधनाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या बातम्या पाहता आम्हाला अजित पवार यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत असं पत्र लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलिसांना दिले आहे.
तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी प्रकरणात दिल्ली येथे 21 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत विमान कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच तपास यंत्रणांकडून विमान कंपनी आणि त्याच्या मालकाला वाचण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा देखील आमदार रोहित पवार यांनी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.
अहमदाबादमध्ये आज चौकार अन् षटकारांचा पाऊस; खेळपट्टी कोणाला करणार मदत ?
अमोल मिटकरींचा रोहित पवार यांना पाठिंबा
तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रोहित पवार यांच्या मागणीला पाठिंबा देत अजित पवार मृत्यू प्रकरणात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आदरणीय दादांच्या मृत्यु प्रकरणाची चौकशी होऊन सत्य समोर यावे याकरिता तांत्रिक बाबी आणी पुरावे महाराष्ट्रातील जनतेसमोर आणून विचार करायला भाग पाडणाऱ्या ,आमदार रोहित पवार यांनी उभारलेल्या लढ्यात आम्ही दादांवर निष्ठा असणारे सर्व सामान्य कार्यकर्ते संपुर्ण ताकदीनीशी न्याय मिळेपर्यंत व सत्य समोर येईपर्यंत या लढ्यात कायम सोबत आहोत.सत्य समोर आणणे हीच दादांना खरी आदरांजली व दादांप्रती निष्ठा ठरेल.
आदरणीय दादांच्या मृत्यु प्रकरणाची चौकशी होऊन सत्य समोर यावे याकरिता तांत्रिक बाबी आणी पुरावे महाराष्ट्रातील जनतेसमोर आणून विचार करायला भाग पाडणाऱ्या ,आमदार श्री रोहित पवार यांनी उभारलेल्या लढ्यात आम्ही दादांवर निष्ठा असणारे सर्व सामान्य कार्यकर्ते संपुर्ण ताकदीनीशी न्याय… pic.twitter.com/gjO1pNNZBY
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 21, 2026
