चकाट्या पिटणाऱ्या गृहमंत्र्यांनी अजित पवारांची नाक रगडून माफी मागावी; ठाकरेंचा शाहंवर पलटवार
Udhhav Thackarey on Amit Shah केंद्रिय गृहमंत्री अमित शाहंच्या टीकेला उत्तर देताना ठाकरेंनी शाहंना थेट चकाट्या पिटणारा गृहमंत्री म्हटलं आहे.
Udhhav Thackarey on Amit Shah for Ajit Pawar : आज 17 नोव्हेंबर रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनानिमित्त ठाकरेंनी अभिवादन केले. त्यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाहंच्या टीकेला उत्तर देताना ठाकरेंनी शाहंना थेट चकाट्या पिटणारा गृहमंत्री म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
अजित पवार हयात असताना त्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे त्यांना राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अशा अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते होणे, ही दुर्दैवाची बाब आहे.
पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर अमित शाह यांनी अजित पवारांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन त्यांची माफी मागायला हवी होती, तुम्ही केलेले आरोप चुकीचे होते, अजित पवार एक महान व्यक्तिमत्त्व होते, अशी कबुली त्यांनी द्यायला हवी होती. काल अमित शाह यांनी अजित पवारांची स्तुती केली. मात्र, त्यांच्याबद्दलचे चांगले शब्द अजित पवार हयात असतानाच बोलले असते, तर त्यांना नक्कीच समाधान मिळाले असते.
यावेळी ठाकरेंनी कोविड काळातील महाराष्ट्राच्या कामगिरीचाही उल्लेख केला. कोविडच्या काळात महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उत्तम काम केले, असा उल्लेख एका व्हिडिओ क्लिपमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्या कामाचे श्रेय स्वतःकडे न घेता संपूर्ण यंत्रणेला दिले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोकांसमोर कितीही चांगल्या पद्धतीने मुद्दे मांडले, तरी त्याचा काही उपयोग होत नाही. अशा व्यक्तींसमोर बोलणे म्हणजे गाढवासमोर गीता वाचण्यासारखे आहे. त्यामुळे अमित शाह यांच्यासमोर अधिक काही बोलण्याची आवश्यकता वाटत नसल्याचेही त्यांनी म्हटले.
अमित शाह यांनी इतर ठिकाणी राजकीय वक्तव्ये करण्याऐवजी मणिपूरमध्ये जाऊन तिथली परिस्थिती समजून घ्यावी, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला. अरुणाचल प्रदेशातील नागरिक आपल्या समस्या मांडत असताना त्यांच्याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. अमित शाह खरोखरच धाडसी असतील, तर त्यांनी सैन्याच्या छावण्यांमध्ये जाऊन जवानांची भेट घ्यावी. चीनच्या विरोधात लढणाऱ्या सैनिकांचे तसेच त्यांना साथ देणाऱ्या नागरिकांचे मनोबल वाढवण्याची गरज आहे. मात्र, देशाची जबाबदारी अशा प्रकारे काम करणाऱ्या लोकांच्या हातात असल्याची टीका करत सत्तेतील नेतृत्व बदलण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
कोविड काळात अमित शाह यांनी फोन केला होता, मात्र आपण तो उचलला नाही, असा दावा खरा असता तर महाराष्ट्रातही उत्तर प्रदेश आणि गुजरातसारखी परिस्थिती निर्माण झाली असती, असा प्रतिवाद ठाकरेंनी केला. उत्तर प्रदेशमध्ये गंगेत मृतदेह सोडण्यात आले, तर गुजरातमध्ये सार्वजनिक ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली होती. मात्र, महाराष्ट्रात अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळाले नाही,
धारावीपासून ते राज्याच्या इतर भागांपर्यंत संपूर्ण सरकारी यंत्रणा कोविडच्या काळात काम करत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर थाळ्या वाजवून जे साध्य झाले नाही, ते महाराष्ट्राने आपल्या कामातून करून दाखवले. त्यामुळे सरकारमधील अकार्यक्षम आणि दिशाभूल करणाऱ्या लोकांना सत्तेतून बाहेर काढण्याची गरज आहे.
नेमकं काय म्हणाले होते अमित शाह?
पुणे जिल्हा परिषदेमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी जिल्हा परिषद परिसरात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, तर मुख्य प्रवेशद्वाराला अजितदादांचे नाव देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत हा नामकरण व अनावरण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर कोरोना काळातील त्यांच्या मुख्यमंत्री पदी असतानाच्या कारभारावरून टीका केली होती.
शाह म्हणाले होते की,