Election Result : काँग्रेसला मोठा धक्का; नाना पटोलेंचा अखेर विजय

  • Written By: Published:
Election Result : काँग्रेसला मोठा धक्का; नाना पटोलेंचा अखेर विजय

Maharashtra Assembly Election Result Live Update : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election Result) 20 नोव्हेंबरला राज्यभरात  एकाच टप्प्यात उत्साहात मतदान पार पडले. त्यानंतर आज (दि.23) अंतिम निकाल हाती आले असून राज्यात महायुतीने 233 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात पार पडलेल्या या निवडणुकीत जवळपास 30 वर्षांनंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालीअसून, राज्यात 65.02 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात तब्बल 30 वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 1995 मध्ये 71.69 टक्के मतदान झाले होते. मतदान पार पडल्यानंतर प्रमुख संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होईल असा कल दिला आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीनेदेखील आम्हीच सत्तेत येऊ असा दावा केला आहे. त्यामुळे एक्झिट पोल कितपत खरे ठरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्याच्या निकालाचे अचूक आणि रिअल टाईम अपडेट्स देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग… या लाईव्ह ब्लॉगशिवाय तुम्ही लेट्सअपच्या यू-ट्युब चॅनलवरदेखील सखोल विश्लेषण पाहू शकाल.

LIVE NEWS & UPDATES

  • 23 Nov 2024 07:27 PM (IST)

    काँग्रेसला मोठा धक्का; नाना पटोलेंचाही पराभव

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि साकोली विधानसभेचे आमदार नाना पटोले यांचा पराभव झाला आहे. भाजपाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी अवघ्या ६५८ मतांनी पराभव झाला आहे.

  • 23 Nov 2024 07:21 PM (IST)

    कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विजयी; राम शिंदेंकडून फेर मोजणीची मागणी

    कर्जत जामखेडमध्ये श्वास रोखून धरायला लावणाऱ्या राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या अतितटीच्या लढतील अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवारांनी 1243 मतांनी विजय मिळवला आहे. मात्र, हा निकाल आपल्याला मान्य नसल्याचे सांगत राम शिंदे यांनी फेर मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे येथील निकाल काय लागतो याचा ट्विस्ट अद्यापही कायम आहे.

     

  • 23 Nov 2024 07:03 PM (IST)

    विधानसभा निकालावर राज ठाकरेंची दोन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

    विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे याचाही पराभव झाला आहे. यानंतर राज ठाकरेंनी एक्सवर दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
    https://twitter.com/RajThackeray/status/1860307475980771675

  • 23 Nov 2024 07:01 PM (IST)

    महाराष्ट्रात अनाकलनीय निकाल लागला : उद्धव ठाकरे

    विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल आहे. या विजयानंतर मविआतील शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात अनाकलनीय निकाल लागला आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

  • 23 Nov 2024 06:48 PM (IST)

    अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

    राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. यात मनसेला एकही जागा मिळालेली नाही. यावर आता अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच... अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.

  • 23 Nov 2024 06:24 PM (IST)

    पराभवानंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया

    पराभवानंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. निकाल धक्कादायक आहे. अनेक शंका जनसामन्यांच्या मनात आहेत. धर्माचा आणि पैशाचा उपयोग राजकारणात केल्याचं थोरात म्हणाले आहेत.

  • 23 Nov 2024 06:03 PM (IST)

    निकाल अतिशय अनपेक्षित ; उद्धव ठाकरे

    विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अतिशय अनपेक्षित असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय. निकालाने मोठी त्सुनामी आल्यासारखं वाटतं, अशी प्रतिक्रिया निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

  • 23 Nov 2024 05:56 PM (IST)

    निकालानंतर छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

    नुकताच राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. छगन भुजबळ विजयी झाल्यानंतर तातडीने मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळतेय. निकालानंतर मुंबईतील राजकीय घडामोडी आणि बैठकांना वेग आलाय.

  • 23 Nov 2024 05:52 PM (IST)

    दिल्लीत निर्णय झाला, शिंदेंना मुख्यंमत्रिपद नाही ; संजय राऊत

    गरज सरो वैद्य मरो! दिल्लीत निर्णय झाला. भाजपा आता एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करत नाही. आता काय? अशी पोस्ट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर केली आहे.

  • 23 Nov 2024 05:50 PM (IST)

    महायुतीचं मुख्यमंत्रि‍पदाचं सूत्र ठरलं

    ज्याचे जास्त आमदार त्याच पक्षाचा मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच महायुतीकडून मुख्यमंत्रि‍पदाची घोषणा करण्यात येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube