मुलुंड अपघात प्रकरणात मृतांच्या वारसाला मिळणार 5 लाख; CM फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis On Mulund Accident :  मुंबईतील मुलुंड अग्रिशमन केंद्राजवळ शनिवारी दुपारी मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान पॅरापेटचा

  • Written By: Published:
Devendra Fadnavis On Mulund Accident

Devendra Fadnavis On Mulund Accident :  मुंबईतील मुलुंड अग्रिशमन केंद्राजवळ शनिवारी दुपारी मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान पॅरापेटचा एक भाग खाली पडल्याने काही जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच या अपघातात मृतांच्या वारसाला 5 लाखांची मदत करण्यात येणार असल्याची देखील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयाकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील मुलुंड भागात (Mulund Accident) मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यलयाकडून देण्यात आली आहे.

ठाकरेंचा हल्लाबोल

तर दुसरीकडे या अपघातानंतर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सोशल मीडियावर करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज बांधकामाधीन मेट्रो 4 मार्गाचा एक मोठा तुकडा एका रिक्षा आणि एका कारवर पडला. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी एक भिंत कोसळली होती आणि तत्कालीन नव्याने उद्घाटन झालेल्या मेट्रो मार्ग 3 मध्ये पावसाचे पाणी भरले होते. सरकार या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकेल का? कदाचित नाही. कदाचित काही लाखांचा दंड दाखवेल आणि कंत्राटदाराला आणखी निविदा काढू देईल. काम पूर्ण होण्यापूर्वीच खांब रंगवलेले आहेत. यासाठी राज्याला काही कोटींचा खर्च येईल आणि नंतर काम पूर्ण झाल्यावर, ते पुन्हा करण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील. आजही, बहुतेक पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये भयानक बॅरिकेडिंग आहेत ज्यामुळे वाहतूक कोंडी होते किंवा वाहने उघड्या खड्ड्यात पडतात.

पंतप्रधान मोदी करणार बांगलादेशाचा दौरा; तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित?

भाजप राजवटीत जीवनाचे काही मूल्य नाही. मेट्रो मार्गावरून पडणारे तुकडे, वाहतुकीचे असुरक्षित मार्ग, तासनतास मदतीशिवाय कार/बाईक उघड्या खड्ड्यात पडणे ही  किती लाजिरवाणी गोष्ट आहे.  लवकरच असा दिवस येईल जेव्हा इतर देश आपल्या देशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना या गोष्टींसाठी मार्गदर्शक सूचना जारी करतील असं आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

follow us