शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मंत्रीपदासाठी हपापलेले दोन–चार लोक; विलीनीकरणावर संजय राऊतांचा इशारा
Sanjay Raut On NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय
Sanjay Raut On NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मात्र या विलीनीकरणावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याने विलीनीकरणावर अनेक तर्ववितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना इशारा दिला आहे. तसेच विलीनीकरणाचा खेळ दिवसेंदिवस हास्यास्पद ठरत आहे असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत मंत्रीपदासाठी हपापलेले दोन- चार लोक असू शकतात. त्यांच्यासाठी शरद पवारांनी त्यांच्या जीवनाचे इतकी वर्षे पाळलेले सत्त्व नष्ट करावे हे बरे नाही. या खेळात कोण कोणात विलीन ( NCP Merger) होणार हा पुढचा प्रश्न. भाजपच्या (BJP) पायाशी बुटचाटेगिरी करणाऱ्या गटाशी शरद पवारांनी चर्चा करत बसावे व महाराष्ट्रात संभ्रम, संशयाचे वातावरण निर्माण व्हावे हे राज्याच्या परंपरेला शोभणारे नाही असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) , सुप्रिया सुळे (Supriya Sule) , जयंत पाटील (Jayant Patil) आणि शशिकांत शिंदेंसारख्या (Shashikant Shinde) पुढाऱ्यांनी या खेळात वाहत जाऊ नये. ओंडकेही असेच वाहत जातात. विलीनीकरणाचा खेळ दिवसेंदिवस हाऱ्यास्पद ठरत आहे.
भारतीय कसोटी संघात बदल; न्यूझीलंड मालिकेसाठी कुलदीप यादव बाहेर; स्टार खेळाडूचा समावेश
अमित शहा पुणे दौऱ्यावर
तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहे. अमित शहा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करणार आहे. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.