Karnataka Election : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्वच उमेदवारांचा उडाला धुव्वा

Karnataka Election : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्वच उमेदवारांचा उडाला धुव्वा

Karnataka Election Result : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निवडणुकीमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर भाजप (BJP) दुसऱ्या क्रमांकावर पडलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 135 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसनं चांगलीच मुसंडी मारली आहे. दुसरीकडे या अवघ्या महाराष्ट्रासह कर्नाटकचं लक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Integration Committee)कामगिरीकडं लागलं होतं. पण या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा धक्का बसला आहे. बेळगावमध्ये एकीकरण समितीला सर्वच जागांवर पराभव स्वीकारावा लागला आहे.

Karnataka Election : भाजपला धक्का! पिछाडीवर असलेले महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी दवाखान्यात

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 11 मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर सात जागांवर भाजपनं आघाडी मिळवली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुरलीधर पाटील (खानापूर), रमाकांत कोंडूसकर (बेळगाव दक्षिण), अमर येळ्ळूरकर (बेळगाव उत्तर) आणि आर.एम. चौगुले यांना बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

बेळगाव दक्षिणमधून भाजपचे आमदार अभय पाटील 11 हजार मतांनी विजय झाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर यांना 64 हजारांवर मते मिळाली निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना अथणी मतदारसंघामधूनच काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे.

चिकोडीमधून कॉंग्रेसचे गणेश हुक्केरी यांनी विजय मिळवला आहे. कुडचीमधून महेश तमन्नावार विजयी झाले आहेत. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विजयश्री खेचून आणला आहे. तर यमकनमर्डीमध्ये सतीश जारकीहोळी यांनी विजय मिळवला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube